ग्रेट मराठी न्युज ( GM NEWS ), वास्तव वृत्त : जय सप्तश्रुंगी मॉ निवासिनी ट्रस्टला नवरात्रोत्सवाचा विसर ! ‘क ‘ वर्ग दर्जा प्राप्त सप्तशृंगी मातेचे मंदिर पहूर येथून हरवले ? देवी भक्तांच्या भावनांशी क्रूर चेष्टा ! मंदिर शोधण्यासाठी प्रशासनाकडे संतप्त भाविकांची मागणी !

0
45

पहूर , ता . जामनेर ( १८ )

‘ या देवी सर्वभूतेषु

 शक्ती रुपेन संस्थिता 

नमस्तसै नमस्तेसै

 नमस्तसै नमो नमः

सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाचा जागर सुरू असून दुर्गा मातेच्या उपासनेला बहर आला आहे . देवीची सर्वच मंदिरे विद्युत रोषणाईने सजली असून विविध धार्मिक कार्यक्रमांची मंदिरांमध्ये रेलचेल आहे . पहुर येथील जय सप्तशृंगी मा निवासिनी ट्रस्टला चक्क नवरात्रोत्सवाचाच विसर पडला आहे . पहूर कसबे गावातील जय सप्तशृंगी मा निवासिनी ट्रस्टचे क वर्ग दर्जा प्राप्त मंदिरच वरून गायब झाली की काय ? हा प्रश्न पडला असून भाविक संतप्त झाले आहेत .

    पहुर कसबे येथे वाघूर नदीच्या तीरावर जय सप्तशृंगी मा निवासिनी ट्रस्ट स्थापन करण्यात आली असून ग्रामपंचायतच्या नमुना नं ८ वर ट्रस्टच्या अध्यक्षांना मालकी हक्क प्रदान करण्यात आला आहे . पहूर कसबे गावाच्या प्रवेश द्वारा जवळ असलेल्या या ट्रस्टला ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ‘क ‘ दर्जा प्राप्त झालेला आहे . परंतु येथे कुठलेही मंदिर नसताना ट्रस्टला ‘क ‘वर्ग दर्जा मिळाला कसा ? . क दर्जा प्राप्त ट्रस्टला नवरात्रोत्सवाचा विसर का पडला . आज अक्षरशः या मंदिराच्या जागेवर उकिरडा साचला आहे घाणीचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे . यामुळे देवी भक्तांच्यामी भावना संतप्त झाल्या असून प्रशासनाला मंदिर शोधून दाखविण्याचे संतप्त मागणी भाविकांमधून केली जात आहे . 

मंदिर अस्तित्वात नसताना क वर्ग दर्जा प्राप्त झाला कसा ? केवळ शासकिय अनुदान आणि योजना लाटण्या साठीच ट्रस्ट स्थापन केली का ? हजारो भाविक मंदिरात दर्शनाला येतात असे धादांत खोटे दाखले कोणी दिले ? 

‘क ‘दर्जा देण्यासाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे जनतेसह भाविकांचे लक्ष लागून आहे .