GM NEWS, आनंदाचे वृत्त: जामनेर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ ! 100 आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आली कोरोना प्रतिबंधक लस. नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन यांच्या उपस्थीतीत डॉ.जयश्री पाटील ठरल्या कोरोना लस घेणाऱ्या जामनेर तालुक्यातील पहिल्या भाग्यवान नागरीक .

0
382

जामनेर,दि.१६ ( मिलींद लोखंडे ) : –
कोरोना विरुद्धच्या लढाईत जगातील सर्वात मोठया लसीकरण मोहिमेची सुरवात आज सुरवात करण्यात आली. महाराष्ट्रात 285 केंद्रांवर व जळगांव जिल्ह्यात 7 ठिकाणी लसीकर केंद्र तयार करण्यात आले आहे त्यामध्ये तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय जामनेर चा समावेश आहे.जामनेर तालुक्याला एकूण 450 डोस पहिल्या टप्प्यात मिळालेले असून तालुक्यात 1745 जणांची नोंदणी यापूर्वीच करण्यात आलेली असल्याची व एका सत्रात 100 लाभार्थींना लस टोचण्यात येणार आहे नोंदणी केलेल्या पैकी कोणी आले नाही तर राखीव यादीतील लाभार्थीना फोन करून बोलवून लस देण्यात येईल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी दिली.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे यांनी नोडल अधिकारी म्हणून काम पाहिले. कोरोना लस ही सर्वांसाठीच फायद्याची आहे.कोणत्याही लसीचे जसे साईड इफेक्ट्स असतात त्याच प्रमाणे काही सौम्य साईड इफेक्ट्स या लसीचे दिसू शकतात. परंतु स्वतःचे रक्षण व आजार पसरण्याचा धोका टाळण्यासाठी लस फायदेशीर आहे असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे यांनी सांगितले.
जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली लस डॉ. जयश्री पाटील यांना देण्यात आली. व्हक्सीनेटवर वनिता जाधव यांनी लस टोचली. मंदा हटकर व कविता नवघरे यांनी लाभार्थीचे तापमान व रक्तातील ऑक्सिजन चे प्रमाण मोजून ओळख पत्राची पहाणी केली.
वैभव देशपांडे व सागर चौधरी यांनी कोविन अप मध्ये लाभार्थींची एन्ट्री करून लस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र तयार केले.जोत्स्ना सुरवाडे व वैशाली सुतार,मोनाली सावळे,संघमित्रा खंडारे यांनी लस दिल्यानंतर अर्धा तास निरीक्षण केले.कार्यक्रम प्रसंगी जामनेर नगरीच्या नगराध्यकक्षा साधना महाजन, पोलीस उपनिरीक्षक प्रताप इंगळे, नोडल अधिकारी डॉ. विनय सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे,डॉ.मनोज चौधरी,डॉ.हर्षल चांदा, डॉ.प्रशांत महाजन,डॉ.वैशाली महाजन,डॉ. रमेश पाटील, डॉ.आर.के पाटील,डॉ. गुलाम दस्तगिर, व्ही एच माळी, रवींद्र सुर्यवंशी, एस. बी.सूर्यवंशी, अतुल माळी, रवींद्र कपले,संदीप आसक, विक्रांत परदेशी,किशोर पवार, आशा कुयटे,सुशीला चौधरी, सारिका मांडोळे, वंदना बडगुजर, सिमा पाचपोळ , सुरक्षा रक्षक जगदिश सोनार व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते .सदर प्रसंगी ईश्वरलाल जैन पथसंस्थेमार्फत कचरूलाल बोहरा यांच्याकडून लस घेतलेल्या लाभार्थींना चहा,बिस्कीट व शुद्ध पाण्याचे वाटप करण्यात आले.