GM NEWS , ग्राम रणधुमाळी : जामनेर तालुक्यातील पहूर कसबे ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व कायम ! अपक्ष उमेदवार राजू जाधव यांच्या रिक्षाचा करीष्मा ; तर विक्रम घोंगडे यांनी नोंदवला विक्रम ! प्रथमच पहूरकरांनी दिली अपक्ष उमेदवारांना पसंती ! १७ पैकी ९ जागांवर भाजप तर ६ जागांवर परिवर्तन पॅनलचा विजय !

0
618

पहूर ,ता .जामनेर दि . १८ ( शंकर भामेरे )जामनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या केंद्रबिंदू असलेल्या पहूर कसबे ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्ष प्रणीत जय गोगडी – देवळी विकास पॅनलने १७ पैकी ९जागांवर विजय मिळवत गेल्या तीस वर्षांची सत्ता अबाधित ठेवली आहे .तर तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाविकास आघाडी प्रणित परिवर्तन पॅनलला सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे .विशेष म्हणजे या निवडणुकीत पहूर कसबे गावाच्या इतिहासात ग्रामपंचायत स्थापनेपासून प्रथमच राजू रामदास जाधव आणि विक्रम पंडीत घोंगडे या दोन अपक्ष उमेदवारांना जनतेने विजयाचा कौल दिला आहे .
पहूर कसबे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १७जागांसाठी ५ अपक्षांसह ३९ उमेदवारांनी आपले भाग्य अजमाविले .
यात भाजप प्रणीत जय गोगडी -देवळी विकास पॅललचे विजयी उमेदवार खालील प्रमाणे .
प्रभाग क्रमांक १ मध्ये तेजराज (सोनू ) अरुण बावस्कर ,
शेरखा निजाम तडवी
प्रभाग क्रमांक – ३ आशा शंकर जाधव
प्रभाक क्रमांक – ४
योगेश विठ्ठल भडांगे,
वासुदेव पंडित घोंगडे ,
ज्योती सुभाष धनगर,
प्रभाग क्रमांक ५
जिजाबाई पुंडलिक लहासे
प्रभाग क्रमांक ६
सुनिता लक्ष्मण गोरे आणि अनिता शिवदास लहासे .

तसेच महाविकास आघाडी पुरस्कृत परीवर्तन पॅनलचे प्रभाग निहाय विजयी उमेदवार खालील प्रमाणे .
प्रभाग क्रमांक – २
मनिषा युवराज चौधरी
प्रतिभा ईश्वर बनकर
प्रभाग क्रमांक – ३
मिराबाई शिवाजी राऊत ,
विनोद रामदास थोरात ,
प्रभाग क्रमांक -५
कल्पना दिनकर पवार
प्रभाग क्रमांक ६
अशोक लक्ष्मण जाधव

प्रभाग क्रमांक २ मधून रिक्षा निशाणी वर निवडणूक लढवलेले अपक्ष उमेदवार राजू रामदास जाधव यांनी ११०३ पैकी ६६८ मते मिळवून सुमारे ४९१ मतांनी दणदणीत विजय मिळविला . सोशल मीडियाचा प्रचारासाठी योग्य उपयोग राजू जाधव यांनी सुरवातीपासूनच करून निवडणुकीत रंगत भरली होती .
तसेच प्रभाग क्रमांक पाच मधून विक्रम पंडित घोंगडे यांना जनतेने विजयाचा कौल दिला आहे .

अपक्ष उमेदवार राजू जाधव यांचा विजय जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या विजयाची मिरवणूक काढून आपला आनंदोत्सव साजरा केला .
भारतीय जनता पक्षाची गेल्या तीस वर्षांपासून पहूर कसबे ग्रामपंचायतीवर असलेली सत्ता कायम राखण्यात माजी पंचायत समिती बाबुराव आण्णा घोंगडे यांना यश आले असून त्यांनी ग्रामपंचायतीवर असलेले आपले वर्चस्व कायम राखले आहे .तसेच शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अशोक लक्ष्मण जाधव यांच्या विजयाने शिवसेनेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .


अपक्ष उमेदवार राजु जाधव यांचा विजय झाल्याने मित्र परीवाराने एकच जल्लोष साजरा केला .