पाचोरा तालुक्यातील कलाकारांच ‘जीवघेण’अल्बम गीत २८ सप्टें प्रदर्शित होणार !

0
303


लोहारा ता पाचोरा, दि .२६( ज्ञानेश्वर राजपुत) : –
कलर्स फिल्म प्रस्तुत(स्वप्नील पाटील) , निर्माते चरणसिंग राठोड आंबेवडगाव ता.पाचोरा व प्रवीण जाधव वरसाडे तांडा तालुका पाचोरा दिग्दर्शन व संगीतबद्ध या खान्देशी भूमीतील कलाकार व विचारवंतांनी तयार केलेलं जीवघेण खास मराठी भाषेतील हे अल्बम गीत उद्या दिनांक 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शीत होत आहे . शनिवार रोजपासून रसिकांच्या मनोरंजनासाठी ‘जीवघेण’ गीत दाखल होणार आहे . या मराठी अल्बम गीताची शूटिंग दोन महिन्याआधी गोवा येथे झाली आहे , हे गीत मनोरंजनासाठी मार्केटमध्ये केव्हा येणार ? अशी अपेक्षा ग्रामस्थ व रसिकांना लागलेल्या होत्या .वास्तविक पाहता अभिनेता विशाल राठोड हा ग्रामीण भागातील आंबेवडगाव(तांडा) येथील सामान्य कुटुंबातील व अभिनेत्री डॉ. प्रियंका पाटील या पाचोरा-भडगाव आमदार किशोर पाटील यांच्या सुपुत्रि आहेत भविष्यात येणाऱ्या उत्सवांसाठी या ग्रामीण भागातील कलाकारांनी मनोरंजनासाठी एक संगीत मेजवानीची भेट म्हणुन दिली आहे जीवघेण अल्बम गीत हे उद्यापासून दुपारी चार वाजेनंतर “विशाल राठोड व्ही.आर” युटूब चॕनल वर व मराठीतील सर्व टीव्ही चॅनल्स जसे की, मायबोली,संगीत मराठी नाईन एक्स झकास व ऑडिओ चॅनल जिओसावन गाना डॉटकॉम,हंगामा यावर पाहता व ऐकता येईल ग्रामीण भागातील कलाकार व त्यात पंजाबी सॉन्गप्रमाणे संगीतबद्ध झालेल असल्याने रसिकांच्या पसंतीला हे अल्बम गीत उतरणारच अशी अपेक्षा यातील मुख्य अभिनेता व अभिनेत्री सर्व सहकलाकार यांनी व्यक्त केली आहे.