GM NEWS, अभिनंदनीय वृत्त: युवासेनेच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत आंबेवडगाव येथील महेंद्र शेरे यांना उत्तेजनार्थ बक्षीस.

0
283

शेंदुर्णी , दि .२४ ( विलास अहिरे – पाटील ) येथुन जवळच असलेल्या पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथे शिवसेनाप्रमुख हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 90 व्या जयंती निमित्त भव्य जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या .
शिवसेना अंगीकृत युवा सेनेच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .आठ किलोमीटर अंतर युवा गटासाठी ठेवण्यात आले होते . या स्पर्धेत तरुणांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला .
आंबेवडगाव येथील महेंद्र शाम शेरे यांनी या स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला .त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले . त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .