GM NEWS,: कृषी पर्यटन वृत्त: जामनेर तालुक्यातील ‘जगात भारी कुंभारी’ कृषीपर्यटन स्थळावर हुर्डा पार्टीचे आयोजन . 26 जानेवारी रोजी पर्यटकांसाठी अत्यल्प शुल्कात कृषी पर्यटनाची पर्वणी. लाभ घेण्याचे प्रभाकर साळवे यांनी केले आवाहन !

0
529

तोंडपुर,दि.२४ ( एकनाथ कोळी / विद्यानंद आहिरे ) : –
जामनेर तालुक्यातील कुंभारी बु!!येथे जगात भारी कुंभारी कृषी पर्यटन स्थळावर हुर्डा पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे . कोरोना नंतर प्रथमच अश्या प्रकारचे आयोजन करण्यात आले असून जामनेर ताल्युक्यात अश्या प्रकारचे आयोजन प्रथमच करण्यात होत आहे.
हुर्डा पार्टीसाठी लोकांना दुर दर जावे लागते , पण आज आपल्या जवळ असा कार्यक्रम होत आहे . याचा आनंद पर्यटकांमध्ये आहे .हुर्डा पार्टीसोबत स्वादिष्ट जेवण ,नाष्टा, हाँर्स राईडींग ,बैल गाडी, ट्रँक्टर सवारी याच बरोबर आँर्केस्ट्रा विविध खेळ घेण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम २६ जानेवारी एक दिवस ठेवण्यात आला आहे सकाळी ९:३० ते सायंकाळ ४:३० पर्यन्त चालणार आहे .औरंगाबाद येथील AB मिडीया ईवेन्ट्स कंपनी आयोजन करणार आहे. ग्रामिण कृषी पर्यटनाचा सर्वांनी आनंद घ्यावा , असे आयोजक प्रभाकर साळवे यांनी आवाहन केले आहे. अधिक माहिती साठी संपर्क ९६०४१७६११७/+918888700225 याक्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे .