GM NEWS,आंदोलन वृत्त : जामनेर-पाचोरा पी.जे.रेल्वे त्वरीत सुरु करा ! अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा . जामनेर शहर शिवसेनेच्या वतीने रेल्वे विभागाला निवेदन सादर .

0
330

जामनेर,दि.२८ ( मिलींद लोखंडे ) : – सन १९१९ इंग्रज राजवटी पासुन पाचोरा – जामनेर या ५६ कि.मी च्या नॅरोगेज मार्गावर धावणाऱ्या पीजे रेल्वे गाडीला कोरोना लॉकडाऊन सुरु झाल्या पासुन बंद करण्यात आले आहे .
सद्य स्थितीत कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने शासनाने अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसह बस प्रवास सुद्धा सुरु केलेला आहे . मात्र जामनेर – पाचोरा या दोन्ही तालुक्यांची जीवनवाहीनी असलेली पी .जे रेल्वे गाडीची प्रवास सेवा अद्याप सुद्धा बंदच आहे . त्यामुळे पी. जे गाडीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायीक, प्रवासी यांना नाईलाजाने खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे . जनतेसह विद्यार्थ्यांना यामुळे आर्थिक भुर्दंड पडत असुन गरीबांची जिवन वाहीनी असलेल्या पी .जे . रेल्वेला पुन्हा त्वरीत सुरु करण्याची मागणी जामनेर शहर शिवसेनेच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली आहे .
पी.जे रेल्वेच्या पाचोरा -जामनेर अशा दिवसा मधुन दोन फेऱ्या पुर्वी प्रमाणेच त्वरीत सुरु कराव्या व गरीब जनतेसह विद्यार्थ्यांचे होणारे नुकासान टाळावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जामनेर शहर शिवसेनेच्या वतीने लेखी निवेदनाव्दारा रेल्वे विभागाला देण्यात आला आहे . निवेदन सादर करते वेळी शहरप्रमुख अतुल सोनवणे, ज्ञानेश्वर जंजाळ, उपसंघटक सुधाकर सराफ , उपशहर प्रमूख दिपक माळी सर , सुरेश चव्हाण , भूषण ललवाणी , तुकाराम गोपाळ कल्पेश महाजन यांच्यासह सर्व शिवसैनिक हजर होते .