GM NEWS, आनंदाची बातमी : जळगांव जिल्ह्यातील पत्रकार बांधवांना दिली जाणार कोरोना प्रतिबंधक लस. पत्रकार बांधवांनी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात एकत्रीतपणे नाव नोंदणी करण्याचे आवाहन .

0
135

जळगांव,दि. ३१ ( मिलींद लोखंडे ) : –
जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू असून दुसरा टप्पाही लवकरच सुरू होत आहे. या टप्प्यात महसुल, पोलीस, माध्यम प्रतिनिधींसह फ्रन्टवर्कसचा समावेश करण्यात आला आहे.

त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व माध्यम प्रतिनिधींना विनंती आहे की, त्यांनी आपले नाव, पत्ता, वय, लिंग (पुरूष/स्त्री), मोबाईल नंबर, आधारक्रमांक, पॅनकार्ड क्रमांकाची माहिती वृत्तपत्र/ वृत्तवाहिनीच्या लेटरहेडवर आणि सोबत ओळखपत्राची झेराॅक्स आदि माहिती म. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयात लवकरात लवकर जमा करावी .

आपण सादर केलेली परिपूर्ण माहिती ॲपवर अपलोड केली जाईल. त्यानंतर आपणास लसीकरणाचा दिनांक, स्थळ व वेळेबाबतचा संदेश आपल्या मोबाईलवर येईल. तेव्हा आपण लसीकरणासाठी उपस्थित रहावे.
जिल्ह्यातील दैनिक व वृत्तवाहिनीनिहाय प्रतिनिधींची एकत्रित माहिती सादर केल्यास अधिक सोईचे राहील .

जळगाव जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींनी कोरोनाच्या कठीण काळात अतिशय मेहनत घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य केले आहे.असेच सहकार्य कोरोना लसीकरणासाठी करून आपली माहिती लवकर पाठविण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने श्री .विलास बोडके
जिल्हा माहिती अधिकारी
जळगाव यांनी केले आहे .