GM NEWS, क्रीडा वृत्त: औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय १९ वर्ष आतील १८ व्या आणि खुल्या( सीनियर) गटातील १० व्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची २ फेबुवारी मंगळवार रोजी निवड चाचणी . जळगांव जिल्ह्यातील स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छीणाऱ्या खेळाडुंनी जामनेर येथे निवड चाचणीसाठी उपस्थीत राहण्याचे आवाहन !

0
308

जामनेर,दि.३१ ( मिलींद लोखंडे) :-
महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या १९ वर्षाच्या आतील क्रिकेट खेळाडुंची १८ वी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा व खुल्या (सिनियर ) खेळाडुंची १० राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे .
या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेकरिता जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी ०२ फेब्रुवारी वार मंगळवार रोजी दुपारी ०३: ३० अंजुमन उर्दू शाळा, मैदान बोदवड रोड जामनेरला होणार आहे.
१ जानेवारी २००१ नंतर जन्मलेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .
अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा महासंघटना चे अध्यक्ष प्रा.आ. चंद्रकांत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते तथा संघटनेचे उपाध्यक्ष शकील पटेल, डॉ. प्रदीप तळवलकर, प्रा. आसिफ खान, शेख हुस्नोद्दिन, शेख जलाल, प्रशांत वाघ , राहुल कोळी, प्रतिक कुलकर्णी, विकास पाटील, चेतन वानखेडे, तारीख अहमद यांनी केले आहे.