जिल्हाधिकाऱ्यांनी साधला व्हिडीओ कॅान्फरन्सद्वारे सीमावर्ती भागातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद .

0
164

जळगाव, दि. 29 ( प्रतिनिधी ) : – आगामी विधानसभासार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी, बऱ्हाणपूर व खरगोण येथील जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्यासोबत व्हिडीओ कॅान्फरन्सद्वारे संवाद साधुन निवडणूकीबाबत चर्चा केली.

बडवाणीचे जिल्हाधिकारी अनिल तोमर, बऱ्हाणपूरचे जिल्हाधिकारी राजेशकुमार व खरगोणचे जिल्हाधिकारी गोपालचंद डॅड तसेच बडवाणी येथील पोलीस अधिक्षक डी. आर टेनीवार, बऱ्हाणपूरचे पोलीस अधिक्षक अजय सिंग, खरगोणचे पोलीस अधिक्षक सुनिलकुमार यांना मध्यप्रदेश राज्याचा सीमावर्ती भागातून अवैध मद्यविक्री, अवैध शस्त्रांची तस्करी, अवैध वाहतुक होणार नाही यासाठी संबंधित जिल्ह्यातील यंत्रणेमार्फत बारकाईने लक्ष ठेवावे तसेच मध्यप्रदेशातून येणाऱ्या वाहनांची तपासणी नाक्यावर कडक तपासणी करून निवडणुका निर्भयपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी व्हीडीओ काॅन्फरन्सप्रसंगी पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, उप जिल्हा निवडणुक अधिकारी तुकाराम हुलवळे, मोटार वाहन निरीक्षक विलास चौधरी, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक सी. पी. निकम आदि उपस्थित होते.