GM NEWS, अभिनंदनीय वृत्त: भुसावळ येथील मध्य रेल्वेचे कर्मचारी महेश भालेराव यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव .

0
189

भुसावळ,दि. ११ ( राजेश शितोळे ) : –
भुसावळ येथील मध्य रेल्वेच्या मेडीकल विभागातील कार्यालयात 2019-20 मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल भुसावळचे महेश तुकाराम भालेराव यांना डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रासह रोख दोन हजाराचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
भुसावळ येथील कृष्णचंद्र हॉलमध्ये 65 व्या रेल्वे सप्ताहनिमित्त पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यावेळी सीएमएस पी.के.समंतराय, मध्य रेल्वे महिला कल्याण संगठनच्या अध्यक्षा नीता गुप्ता, एडीआरएम मनोजकुमार सिन्हा, वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये महेश भालेराव हे सध्या कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या गौरवाबद्दल मित्र परिवार, नातेवाईक, सुवर्णकार समाज बांधव तसेच सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.