GM NEWS,प्रेरणादाई वृत्त: भारत – पाकिस्तान 1971 च्या युध्दात सहभाग घेतलेल्या सैनिकांचा होणार गौरव .

0
160

जळगाव,दि.12(मिलींद लोखंडे ) :
सन 1971 मध्ये भारत-पाकिस्तानात झालेल्या युध्दात सक्रिय सहभाग घेतलेल्या सैनिकांचा उचित गौरव करण्यात येणार आहे. या युध्दात सहभागी झालेले जळगाव जिल्ह्यातील जे हयात सैनिक आहेत. ज्यांना सैन्य सेवेचे निवृत्तीवेतन आणि केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेकडून मासिक/वार्षिक चरितार्थ मिळत नाही. अशा सैनिकांनी महाराष्ट्र राज्याच्या अधिवासधारक सैनिकांनी युध्दात सक्रिय सहभाग घेतल्याबाबत पुराव्याची छायांकित प्रत घेऊन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत येऊन भेट द्यावी. असे आवाहन राहूल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.