GM NEWS , Big Breaking: बेपत्ता युवकाचा फाशी घेतलेल्या स्थीतीत आढळला कुजलेला मृतदेह. जामनेर शहरातील खळबळजनक घटना .

0
224

जामनेर दि .२९ ( ईश्वर चौधरी ) :- जामनेर शहरातील इंदीरा आवास नगर मधील गेल्या ८ दिवसां पासुन बेपत्ता असलेल्या राजु भिका भोई या युवकाचा मृतदेह जामनेर पुरा भागातील ढोर रस्ता परीसरात फाशी घेतलेल्या अवस्थेत आज आढळला आहे .मृतदेह कुजलेल्या स्थीतीत असल्याने या परीसरात खुप दुर्गंधी पसरली होती त्यामुळे मृतदेहावर तात्काळ अंत्यंसंस्कार करण्यात आले आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की , शहरातील इंदीरा आवास नगरामधील राजु भिका भोई ( वय ,२o ) हा युवक गेल्या आठ दिवसां पासुन बेपत्ता होता . तो हरवला असल्याची नोंद जामनेर पो.स्टे ला काल करण्यात आली होती. दरम्यान आज सायंकाळी जामनेर पुरा परीसरातील ढोर रस्ता भागात त्याचा कुजलेला मृतदेह आढळला आहे .मृतदेह झाडाला फाशी घेतलेल्या स्थीतीत असल्याने त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवीला जात आहे . घटनास्थळी मृतदेह अत्यंत कुजलेल्या स्थीतीत आढळल्याने या ठीकाणी प्रचंड दुर्गंधी पसरली होती . घटनास्थळाला जामनेर पोलीसांनी भेट देत पंचनामा केल्या नंतर मृतदेहावर अत्यंसंस्कार लागलीच करण्यात आले आहेत. मृत राजु भोई याचा मृत्यु नेमका कशामुळे झाला याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. या बाबत जामनेर पोलीस पुढील तपास करत आहेत.