GM NEWS , राजकीय वृत्त : पहूर कसबे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी आशा जाधव यांची तर उपसरपंचपदी राजू जाधव यांची निवड . पहूर -कसबे ग्रामपंचायतीवर ३० वर्षांची सत्ता अबाधित राखत बाबुराव आण्णा घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली फडकला ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा .

0
567

पहूर , ता .जामनेर दि . १५ ( शंकर भामेरे ) :-जामनेर तालुक्याचा राजकीय केंद्रबिंदू असलेल्या पहूर कसबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाचेच वर्चस्व सिद्ध झाले असून ग्राम पंचायत सरपंचपदी आशाबाई शंकर जाधव यांची बिनविरोध निवड झाली . तर उपसरपंचपदी राजू रामदास जाधव ( राजू भैय्या ) यांची निवड झाली .
आज सोमवारी ( ता .१५ )दुपारी दोन वाजता ग्रामपंचायत सभागृहात सरपंच उपसरपंच निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला .निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळाधिकारी प्रशांत निंबाळकर यांनी काम पाहिले .
माजी पंचायत समिती सभापती बाबुराव आण्णा घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ३० वर्षांपासून ग्रामपंचायत मध्ये सत्ता असून या पंचवार्षिक निवडणुकीतही त्यांनी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे .
भाजपाप्रणित जय गोगडी देवळी विकास पॅनलला १७ पैकी ९ जागांवर विजय मिळाला होता .शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस महाविकास आघाडी पुरस्कृत परिवर्तन पॅनलला ६ जागांवर समाधान मानावे लागले होते .तर राजू जाधव आणि विक्रम घोंगडे हे दोन अपक्ष उमेदवार निवडून आलेले होते .
पहूर कसबे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सर्वसाधारण गटाचे आरक्षण जाहीर झाले होते . त्यानुसार आज सरपंच , उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली .
याप्रसंगी जय गोगडी देवळी विकास पॅनल तर्फे आशाबाई शंकर जाधव यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला .तर उपसरपंच पदासाठी अपक्ष उमेदवार राजू रामदास जाधव यांनी अर्ज दाखल केला त्यांना ९ तर आघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार अशोक लक्ष्मण जाधव यांना ८ मते मिळाली . निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सरपंचपदी आशा जाधव व उपसरपंच पदी राजू जाधव यांची निवड जाहीर केली . सरपंच पदासाठी गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेल तालुका अध्यक्ष वासुदेव घोंगडे , माजी सरपंच लक्ष्मण गोरे यांच्या पत्नी सुनिता गोरे , माजी उपसरपंच योगेश भडांगे यांचीही नावे चर्चेत होती .मात्र अखेर विरोधी सदस्यांनीही पाठिंबा दिल्यामुळे आशाबाई शंकर जाधव बिनविरोध निवडून आल्या . तर उपसरपंच पदासाठी राजू जाधव यांच्या विरोधात आघाडीचे अशोक जाधव यांनी अर्ज दाखल केला असता राजू जाधव यांना ९ मते मिळाल्याने त्यांची उपसरपंच पदी वर्णी लागली .
याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे , माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे , प्रशासक रामचंद्र वानखेडे , लक्ष्मण गोरे , अर्जुन लहासे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव ,शेरखा तडवी , सोनू बाविस्कर ,जिजाबाई लहासे , मनिषा चौधरी , प्रतिभा बनकर , विनोद थोरात , ज्योती धनगर , अनिता लहासे , मीराबाई राऊत , विक्रम घोंगडे , वासुदेव घोंगडे , योगेश भडांगे , सुनिता गोरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते . निवड प्रक्रियेनंतर
सरपंच आशाबाई शंकर जाधव आणि उपसरपंच राजू भैया जाधव यांचा गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला .याप्रसंगी माझी पंचायत समिती सभापती बाबुराव अण्णा घोंगडे , कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती संजय देशमुख , आरोग्यदूत अरविंद देशमुख , युवराज जाधव, किरण पाटील, शंकर जाधव , योगेश भडांगे, चेतन रोकडे ,मधुकर बनकर ,ललित लोढा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते .
तसेच परिवर्तन पॅनलचे प्रमुख विवेक जाधव , मधुकर पवार सर पहूर पेठचे उपसरपंच श्याम सावळे , क्षत्रिय माळी समाज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर करवंदे , राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश पाटील , ग्रामपंचायत सदस्य शरद पांढरे , इका पहेलवान यांनीही सरपंच आशाताई जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .