GM NEWS, अभिनंदनीय वृत्त : नेरी बु. ग्रामपंचायतच्या सरपंच पदी कल्पनाबाई कुमावत तर उपसरपंच पदी निलेश खोडपे .

0
395

नेरी ता.जामनेर,दि. १६ ( सचिन तायडे ) : –
तालुक्यातील नेरी बु. ग्रामपंचायत च्या सरपंच पदी कल्पनाबाई प्रकाश कुमावत तर उपसरपंच पदी निलेश विजय खोडपे यांची निवड झाली.परिवर्तन पॅनल ने 13 पैकी 7 जागा मिळवल्या होत्या या निवडीद्वारे पॅनेलने वर्चस्व सिद्ध केले होते.सोमवारी ही निवड प्रक्रिया पार पडली. सरपंच पदाची जागा सर्वसाधारण स्त्री राखीव असल्याने परिवर्तन पॅनलच्या कल्पनाबाई प्रकाश कुमावत यांनी व जनकल्याण पॅनल च्या वतीने उज्वला सुभाष वाघोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.उपसरपंच पदासाठी परिवर्तन पॅनलचे निलेश खोडपे व जनकल्याण पॅनल चे ईश्वर कोळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले निवड प्रक्रिया पार पडल्या नंतर परिवर्तन पॅनल चे सरपंच पदाचे उमेदवार व उपसरपंच पदाचे उमेदवार एक मताने निवडून आले अशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी खान साहेब यांनी केली.सभेला परिवर्तन पॅनल व जनकल्याण पॅनल चे कल्पना कुमावत,निलेश खोडपे, माधव इधते, संदिप खोडपे, सावित्रीबाई भिल,इंदूबाई पाटील,निशा तायडे व जनकल्याण पॅनल चे उज्वला वाघोडे,ईश्वर कोळी,कल्पेश कुमावत,राजश्री पचपोळे,भगवान इंगळे,प्रमिला इधते सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.ग्रामसेवक श्री केदार यांनी श्री खान यांना सहाय्य केले.निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला.यावेळी नवनिर्वाचित सरपंच कल्पनाबाई कुमावत व उपसरपंच निलेश खोडपे व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रमोद पाटील,अशोक कोळी,अभिषेक पाटील,प्रताप पाटील,किशोर खोडपे, रमेश पाटील, विश्वास पाटील,विवेक कुमावत,देवराम खोडपे, आशिष दामोदर,अनिल खोडपे,देविदास कुमावत,पवन वाघ,प्रशांत पाटील,श्रीराम भोई,सागर कुमावत,मनोज पाटील,रुषांत शेळके,विनोद धानोडे, रमेश कोळी,संदिप हडप,
कृष्णा कोळी,विलास इधते,दत्ता इधते,सचिन शेळके,जयेश पाटील,सूरज पाटील,कुंदन कुमावत,मनोज चौधरी,गौतम जैन,राष्ट्रवादी पुरस्कृत परिवर्तन पॅनल चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.