GM NEWS, अभिनंदनीय वृत्त: गोद्री ग्रामपंचायत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या मंगलाबाई भगवान पाटील सरपंचपदी तर रामेश्वर गणपत राठोड यांची उपसरपंचपदी निवड !

0
115

फत्तेपुर, दि. 17 ( सुनिल शेजुळे ) : –
गोद्री ग्रामपंचायत सरपंच निवडणूक दि. 15 / 02 / 2021 रोजी सरपंच निवडीच्या सभेमध्ये सरपंच व उपसरपंच निवडणूकीत मंगलाबाई भगवान पाटील यांची सरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड जाहिर करण्यात आली. तसेच उपसरपंच पदासाठ रामेश्वर गणपत राठोड यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड जाहिर करण्यात आली.
अतिशय चुरशीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवडून
तडवी हमिदा मुलाक,देशमुख सुवर्णा मनोज,कोळी विमलविलास,गायकवाड सुपडू
पाटील मंगलाबाई भगवान,राठोड रामेश्वर गणपत, हे सहा उमेदवार निवडुन आले आहेत .सर्वांचे राष्ट्रवादीचे नेते मंडळी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.

मायलेकी एकाच दिवशी एकाच वेळेस सरपंचपदी विराजमान

गोद्री ग्रामपंचायतमध्ये कै. जनार्दन तुकाराम पाटील (मा. सभापती पं.स. जामनेर ) यांच्या सून व कै. भगवान जनार्दन पाटील ( मा. सरपंच ग्रा .पं गोद्री ) यांच्या पत्नी मंगलाबाई भगवान पाटील यांची सरपंच पदी निवड झाली तर नांद्रा प्र.येथे गोद्री येथील जनार्दन तुकाराम पाटील यांची नात व भगवान जनार्दन पाटील यांची मुलगी शारदा आधार पाटील यांची सरपंचपदी निवड झाली . शारदा आधार पाटील या दिवाकर दोलत पाटील (चेअरमन, शेंदुणी ) यांच्या सून व डॉ. आधार दिवाकर पाटील यांची पत्नी आहे. दि. 15 / 02 / 2021 रोजीच्या निवडणूकीत दोघही मायलेकी सर पंच पदावर विराजमान झाल्या