जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन 3 ऑक्टो रोजी भरणार उमेदवारी अर्ज .

0
263
  1. जामनेर दि .३०( प्रतिनिधी ) :- संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या जामनेर विधानसभा विधानसभा मतदार संघातून अखेर जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे पुन्हा उमेदवारी करणार असल्याचे भाजपच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडून निश्चित करण्यात आले आहे. जामनेर विधानसभा मतदारसंघातून एकूण पाच वेळा प्रतिनिधित्व केल्यानंतर पुन्हा सहाव्यांदा ते विधानसभा लढणार आहे, श्रीमंत बाबाजी राघो पाटील मंगल कार्यालय , पाचोरा रोड, जामनेर येथे 3 ऑक्टोबर गुरुवार रोजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन जामनेर तालुका भाजप ने केले आहे. याकरिता जामनेर भाजप तालुका पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केल्याचे सांगण्यात आले आहे. जास्तीत – जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकार्या कडून करण्यात आले आहे . या दिवशी  प्रचंड शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष जामनेर कडे लागले आहे.