GM NEWS , कारवाई वृत्त : कोरोनाविषाणू संक्रमणाच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जळगाव मध्ये दोन हॉटेल्सवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई . राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे जिल्हाभर धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याची अधीक्षकांची माहिती .

0
273

जळगांव , दि. २४ ( मिलींद लोखंडे ) : –

कोरोना विषाणू संक्रमणाच्या प्रतिबंधासाठी मा .जिल्हाधिकारी जळगाव यांनी त्यांच्या आदेश क्रमांक दंडप्र 01कावी 571 / 2021 दिनांक 17 / 02 / 2021व 22 / 02 /20021 नुसार कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 हा दि 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2 ,3 व 4मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे . आणि त्याबाबतची नियमावली प्रसिद्ध केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्य क्षेत्रात covid-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जळगाव जिल्ह्यातील सर्व हॉटेल रेस्टॉरंट बार क्लब मधील बाहेरील F& B लायसन्स धारक युनिट आउटलेट सह इत्यादी आदरातिथ्य सेवा 50% क्षमते सहा सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत आदेशित केलेले आहेत .
सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वेगवेगळ्या पथकामार्फत ठिकठिकाणी कारवाया सुरू असून रात्री नऊनंतर गस्त घालण्यात येत आहे सदर पथकांकडून दिनांक 23 2 2019 रोजी विहित वेळेनंतर रही अनुज्ञप्ती सुरु आढळलेल्या 1 )हॉटेल श्री . स्टार पॅलेस FL3 बस स्टॅन्ड गृह जवळ जळगाव व हॉटेल जलपरी FL3 क्रमांक 428 कालिंका माता परिसर जळगाव या दोन परवानाधारक व्यक्तींवर विभागीय गुन्हे नोंदवले असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे यानंतर विहित वेळेनंतर ही अनुज्ञप्ती सुरू राहिल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असून सदर व्यक्ती निर्गमित निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल असा इशाराराज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी दिला आहे .