GM NEWS , Big Breaking : वाकोद येथे गावठी दारू अड्ड्यावर पहुर पोलिसांची धाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश परदेशी यांची  अवैध धंदे विरोधात धडक कारवाई .

0
270

पहुर दि .१ ( संतोष पांढरे ) : – पहुर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्या पासुनच नव्यानेच रुजु झालेले सहा . पोलीस निरीक्षक राकेश परदेशी यांनी अवैध धंदेवाल्यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे .
पहुर जवळ असलेल्या वाकोद गावी गावठी दारू अड्ड्यावर आज सकाळी पोलिसांनी धाड टाकुन  कच्चा रसायन व गावठी दारू जप्त करण्यात आला आहे .
नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांनी पदभार स्वीकारल्यापासून सतत अवैध धंदे विरोधात वाश आऊट मोहीम सुरू ठेवली असून आज सकाळी वाकोद गावी हातभट्टी अड्ड्यावर धाड टाकून आरोपी रोहिदास मोरे याच्यासह दोन साथीदारांना रंगेहात पकडण्यात आले या आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहेे .
घटनास्थळाावर कच्चे रसायन पक्की बनवलेली हातभट्टीची दारू ची कॅन असलेली आज भट्टी दारू असे एकूण 10000 हजार रुपयाचा किमती चा माल रंगेहात पकडण्यात आला या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र परदेशी भरत लिंगायत प्रवीण देशमुख या पथकाने ही धडक कारवाई करून अवैध धंदे विरोधात जोरदार मोहीम उघडली असून आज सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांनी  कामाची धडक कारवाई दाखवून दिली या त्यांच्या कारवाईमुळे अवैध धंद्या करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली असून नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांच्या या कामगिरीमुळे नागरिकांनी कौतुक केले असून पहूर पोलिस स्टेशनला प्रथमच सिंघम अधिकारी मिळाल्यामुळे अवैध धंदे बंद झाल्याने अवैध धंदे चालक तसेच काम करणारे मजूर शेतीच्या कामाकडे वळले  असून गेल्या दहा वर्षात प्रथमच अवैध धंदे पहूर पोलिस ठाणे हद्दीत अक्षरशा बंद झाले आहेत याचे श्रेय नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांच्याकडे जाताय पदभार स्वीकारल्यापासून सतत अवैध धंदेवाल्यांंवर जरब बसला आहेे .