GM NEWS , Big Breaking: संजय गरूडांच्या बालेकिल्ल्याला खिंडार . शेंदुर्णी गावातील ५०० मुस्लीम रा कॉ कार्यकर्त्यांचा भाजपा मधे प्रवेश.

0
2535

जामनेर : दिं-१ ( नसीम शेख ) जामनेर तालुक्यातील राजकीय वातावरण आता तापायला सुरुवात झाली असून जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांचे भावी प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते  संजय गरुड यांच्या शेंदुर्णी या बालेकिल्यातील राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या ५०० मुस्लीम कार्यकत्यांनी आज भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यामध्ये गरूडांचे कट्टर समर्थक असलेले माजी उपसरपंच हाजी नबीशहा शकूर शहा यांचा समावेश आहे.

जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या उपस्थितीती  मध्ये त्यांच्या निवासस्थानी आज या राष्ट्रवादी कांग्रेसच्या ५०० कार्यकत्यानी भाजपा मधे प्रवेश केला आहे .विधानसभेच्या ऐन रणधुमाळीत जामनेर भाजपा मध्ये जोरदार झकमींग सुरु झाली असुन तोरनाळा ,शहापूर ,कुऱ्हाड गावातील इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा सुध्दा जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थीती मध्ये आज भाजपा प्रवेश झाला आहे. शेंदूर्णी गावातील नगरपपंचायतीवर सुध्दा यापूर्वीच भाजपाने ताबा घेतला असून येथील भाजपाचे जेष्ठ नेते गोविंद अग्रवाल यांच्या राजकीय खेळीने संजय गरुड यांचे विश्वासू सहकारी हाजी नबीशहा शकूरशहा हे सुद्धा आता भाजपामध्ये दाखल झाले आहेत .विधानसभा निवडणूकींची उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीच संजय गरुडांना हा स्वतःच्या बालेकिल्ल्यात एक मोठा हादरा बसला आहे .