GM NEWS,Big Breaking : मध्यप्रदेशातील दारुची तोंडापुला विक्री . राज्य उत्पादनशुल्क पथकाची कारवाई,स्थानीक पोलीस अनभिज्ञ .

0
794

तोंडापूर ता.जामनेर दि .२ ( एकनाथ कोळी ) : – मराठवाडा विदर्भाच्या सिमेवर असलेल्या तोंडापूर येथे मध्यप्रदेशातुन मोठ्या प्रमाणात मद्य विक्रीस येत असल्याची माहीती राज्यात ऊत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना मिळताच बस स्थानक परीसरातील नाना पाटील यांच्या जागेत असणार्या साई ईरीगेशनच्या दुकानात छापा टाकला असता तेथुन मध्य प्रदेश राज्य विक्री करीता असलेले व महाराष्ट्र राज्य प्रतिबंध असलेले विदेशी मद्य आॕफिसर्स चाॕईस व्हीस्की१८० मी.ली च्या ५० बाॕटल,९०मी.ली.च्या १४२ बाॕटल,इंपिरीयल ब्लु व्हिस्की१८० मी.ली.च्या १४ बाॕटल,बकार्डी रम ७५० मी,ली च्या ८ बाॕटल अशा एकुण २४४४० रुपयाचा अवैध दारुसाठा जप्त केला असुन दारु विक्रेता राजेंद्र कुंडलीक चांदेकर याला पोलीसांनी अटक करुन त्याचेवर कारवाई केली.गांधीजयंतीच्या दिवशी मांडवा तोंडापूर रस्त्यावर असलेल्या खाजगी दुकानात बुधुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असुन खाजगी दुकानाला सेल लावण्यात आला, तोंडापूर येथे बर्याच दिवसापासुन दारु सट्टा,पत्ता हे अवैध धंदे सर्रास सुरु असुन स्थानीक पोलीस कुठलीही कारवाई करीत नसल्याच्या भावना गावातील जेष्ट नागरीक शेषराव भुतेकर यांनी अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केल्या. राज्य उत्पादन शुल्क नाशिकचे विभागीय आयुक्त श्री ओहोळ सर व श्री सी.पी.नीकम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री एस.के.कोल्हे निरीक्षक,भरारीपथकातील आनंद पाटील,एम.डी.पाटील,एन.पी.पाटील,के.पी.सोनवणे,ए.व्ही. गावंडे, यांच्या पथकाने ही कारवाई केली असुन पुढील तपास एस. के. कोल्हे यांचेसह भरारीपथक करीत आहे.तोंडापुर येथे अवैध दारु ,सट्टा,पत्ता खुले आम सुरु असुन स्थानीक पोलीस माञ याकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थातुन बोलले जात आहे.