GM NEWS ,FLASH: जिल्ह्यात 18 ऑक्टोंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू.

0
206

जळगाव, दि. 3 ( प्रतिनिधी ) :- आगामी सण, उत्सव, पुण्यतिथी, जयंती तसेच विधानसभा निवडणूकीची आदर्श आचार संहिता लक्षात घेता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. याकरीता संपूर्ण जिल्हा हद्दीत 4 ऑक्टोंबर, 2019 च्या सकाळी 6.00 वाजेपासून ते 18 ऑक्टोंबर, 2019 च्या 24.00 वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये पाच किंवा अधिक लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगांव यांचे पुर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
हा आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा यांना लागू असणार नाही. असे जळगावचे अपर जिल्हादंडाधिकारी वामनराव कदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.