GM NEWS , गुन्हे वार्ता : पहूर येथील लेलेनगर भागात दारू विक्रीवरून वाद . ५ हजार रुपयांच्या दारुच्या बाटल्या जप्त ; तरुण अटकेत ; गुन्हा दाखल अवैध धंद्या वाल्यांची वाढती मुजोरी .

0
538

पहूर , ता जामनेर दि . ११ (प्रतिनिधी ) : – जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथील लेलेनगरात पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर भररस्त्यावर दारूविक्री करणाऱ्या तरुणास पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की , पहूर पोलिस ठाणे ते बसस्थानक मार्गावर लेले नगर भागात बिनदिक्कतपणे दारू विक्री करणाऱ्या योगेश वसंत चौधरी (वय -३५ वर्षे ) या तरुणास अटक करण्यात आली .आज गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दारूविक्री वरून वादनिर्माण झाला .यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते . मोठ्या संख्येने जमाव जमला होता .घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळावरून ५ हजार २०० रुपये किमतीच्या दारुच्या बाटल्याचे २ खोके जप्त केल्या .याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनिल देवरेयांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा तपास जवानसिंग राजपूत करीत पहूर परिसरात अवैध धंदे अजूनही सुरुच असल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले असून अवैध धंदेवाल्यांची मुजोरी ही दिवसेंदिवस वाढत आहे . अवैध धंद्याचा प्रतिबंध करण्याची नागरीकांनी मागणी केली आहे .