जामनेर,दि.२७ ( मिलींद लोखंडे ) : –
केंद्र व राज्य सरकारच्या वतीने गरीब कुटुंबातील नागरिकांना आरोग्य समस्येवर येणारा प्रचंड खर् पाहता यावर उपाय म्हणून आयुष्यमान भारत कार्ड असणाऱ्या कुटुंबाला वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करण्यात येणार आहे. तालुक्यात,नगरपालिका,नगरपंचायत, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे डेटा ऑपरेटर, आरोग्य सेवक,आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका,आरोग्य मित्र,आपले सरकार केंद्र,या ठिकाणावरून केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड धारक आयुष्यमान भारत कार्ड काढू शकतात. आयुष्यमान भारत कार्ड असणाऱ्या कार्ड धारकास अंगीकृत खाजगी रुग्णालये, महात्मा फुले जन आरोगग योजनेतील रुग्णालये,सार्वजनिक आरोग्य विभागाची सर्व रुग्णालये, वैद्यकीय शिक्षण विभागाची सर्व रुग्णालये, सी.जी.एच.एस.
अंतर्गत ची सर्व रुग्णालये या ठिकाणी विनामुल्य उपचार होणार आहे.
जामनेर तालुक्यात १२६३५५ नागरिक आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी पात्र आहेत.आजपर्यंत ३५०८८ कार्ड काढून झाले आहेत.अजून ९१२६७ नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड काढले नाहीत.
“केशरी व पिवळ्या रेशन कार्ड धारकांनी ९ नोव्हेंबर पर्यत आयुष्यमान भारत कार्ड काढून अन्यथा महिन्याचे रेशन घ्यायला सुद्धा अडचण येऊ शकते . यानंतर ऍप मध्ये काही अपडेशन प्रस्तावित आहेत तसेच तालुक्यात बचत गटामार्फत सुद्धा आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात येणार आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी दिली.