GM NEWS , BREAKING: कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी जामनेर शहरात 4 दिवसांचा ‘ जनता कर्फ्यू ‘ १६ मार्च ते १९ मार्च पर्यंत कडकडीत बंद पाळण्याचा एकमुखी निर्णय . दवाखाने , मेडिकल ,दूध डेअरी या जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय राहणार बंद .

0
1316

जामनेर , दि .१४ ( विनोद बुळे) : – जामनेर शहरात कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी 4 दिवसाचा ‘जनता कर्फ्यू ‘ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूची साखळी अधिकच गतिमान होत आहे .एका सर्वेक्षणानुसार जळगाव जिल्हा देशातील आठव्या क्रमांकावर संक्रमित जिल्हा असून कोरोना विषाणू संक्रमण रोखणे अत्यंत महत्त्वाचे आहे .याच अनुषंगाने जामनेर शहरात माजी मंत्री आमदार गिरीश महाजन , तहसीलदार अरुण शेवाळे , न.पा.मुख्यअधिकारी तसेच व्यापारी असोसिएशनच्या झालेल्या निर्णया नुसार मंगळवार दि. १६ मार्च २०२१ शुक्रवार दि १९ मार्च २०२१ असा ४ दिवसांचा ‘ जनता कर्फ्यू ‘ चे आयोजन करण्यात आले असून या ४ दिवसात कडकडीत बंद पाळला जाणार आहे .

काय राहणार सुरू ?

अत्यावश्यक सेवांमध्ये
दवाखाने ,मेडिकल , दुध डेअरी सुरु राहणार आहे .
दूध डेअरी सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत उघडी राहणार आहे .

काय राहणार बंद –
सर्व भाजीपाला विक्री , फळांची दुकाने , हॉटेल्स , थंडपेयांची दुकाने , सर्व प्रकारचे जनरल स्टोअर्स , किराणा दुकान ,ज्वेलर्स , कापड दुकाने , सलून दुकाने , मटन शॉप आदी सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार आहेत याची जनतेने नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे .

‘जनता कर्फ्यू ‘मध्ये सर्व जामनेर कर यांनी स्वतःहून सहभागी व्हावे आणि कोरोना विषाणूची सामाजिक साखळी खंडित होण्यासाठी महत्त्वाचे योगदान द्यावे ,असेही प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे .