GM NEWS, अभिनंदनीय वृत्त : श्रीमती अंकिता हातवळणे- देशपांडे यांना मध्य रेल्वेचा सर्वोच्च पीसीओएम पुरस्कार जाहिर तर भुसावळ मंडळाचा डी. आर.एम पुरस्कार प्रदान . भुसावळ मंडलातील रेल्वे कर्मचाऱ्यांसह सर्व स्तरातुन होतोय अभिनंदनाचा वर्षाव !

0
268

गारखेडा ता – जामनेर, दि. १४ ( राजेश शितोळे ) : –
मध्ये रेल्वेच्या भुसावळ मंडळ मध्ये परिचालन विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी श्रीमती अंकिता हातवळणे – देशपांडे यांना रेल्वेच्या उत्कृष्ट सेवेसाठी मध्य रेल्वे मुबंई येथील मुख्य कार्यलयाच्या वतीने परिचालन विभागातील दिला जाणारा पी . सी . ओ . एम २०१९ – २० हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला आहे. त्याच प्रमाणे भुसावळ मंडळ रेल प्रबंधक डी. आर.एम. श्री विवेक कुमार गुप्ता सर यांच्या शुभ हस्ते व मंडळाच्या वतीने डी. आर. एम. आवर्ड सुद्धा श्रीमती अंकिता हातवळणे देशपांडे यांना प्रदान करण्यात आला आहे.
परिचालन विभागात विभागीय नियंत्रक या पदावर कार्यरत असतांना त्यांची उत्कृष्ट सेवा , योग्य निर्णयक्षमता तसेच संपूर्ण नियंत्रण कक्षातील एकमेव महिला अधिकारी या सर्व गुणांचा विचार करून या दोन्ही पुरस्काराच्या श्रीमती अंकिता हातवळणे मानकरी ठरल्या आहेत .त्यांच्या या यशमुळे सर्वत्रच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे