विधानसभा निवडणूकीसाठी चौथ्या दिवशी जिल्ह्यात त्रेपन्न उमेदवारांचे चौऱ्यांशी नामनिर्देशनपत्र दाखल .

0
233

जळगाव, दि. 3 ( प्रतिनिधी ) :- विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्याआजच्या चौथ्या दिवशी जिल्ह्यात त्रेपन्न उमेदवारांनी चौऱ्यांशी नामनिर्देशनपत्र दाखल केल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
यामध्ये चोपडा विधानसभा मतदार संघात सात उमेदवारानी दहा अर्ज, रावेर विधानसभा मतदार संघात चार उमेदवारांनी पाच, भुसावळ मतदार संघात पाच उमेदवारांनी आठ, जळगाव शहर मतदार संघात बारा उमेदवारांनी अठरा अर्ज, जळगाव ग्रामीण मतदार संघात चार उमेदवारांनी सात अर्ज, अमळनेर विधानसभा मतदार संघात तीन उमेदवारानी तीन, एरंडोल मतदार संघात एका उमेदवाराने चार अर्ज, चाळीसगाव मतदार संघात सहा उमेदवारांनी दहा अर्ज, पाचोरा मतदार संघात चार उमेदवारांनी सहा अर्ज, जामनेर मतदार संघात पाच उमेदवारांनी अकरा अर्ज, मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात दोन उमेदवारानी दोन असे एकूण पन्नास उमेदवारांनी शहात्तर नामनिर्देशनपत्र दाखल केल्याची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.
जिल्ह्यात 11 विधानसभा क्षेत्र असून विधानसभा निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास 27 सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. यामध्ये आज चौथ्या दिवशी चोपडा-8, रावेर-20, जळगाव शहर-15, जळगाव ग्रामीण-15, एरंडोल-13, पाचोरा-9, जामनेर-13, मुक्ताईनगर-12 असे आज एकूण 105 नामनिर्देशनपत्र वितरीत झाले असल्याची माहितीही संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.