आनंददायी बातमी ! सोयगांव ते शेगांव एस.टी बस सेवा प्रारंभ. गजानन भक्तांनी केले आगार प्रमुखांसह चालक- वाहकांचे स्वागत.

0
311

तोंडापुर दि .४(संभाजी गोतमारे ) : – जामनेर तालुक्यासह सोयगांव तालुक्यातील गजानन भक्तांची पुर्वी पासुन मागणी असलेली सोयगांव ते शेगांव एस टी बस सेवा आज पासुन प्रारंभ करण्यात आली आहे . सोयगांव येथुन प्रथमच आलेल्या या बसचे स्वागत तोंडापुर, कुंभारी बु ,ढालसिंगी येथील गजानन भक्तांनी मोठया भक्तीभावाने आज केले . या प्रसंगी बसचे चालक ,वाहक,आगर प्रमुख यांचे सुध्दा स्वागत ग्रामस्थानी केले .

सोयगाव येथून रोज सकाळी आठ वाजता ही बस सुटणार आहे या गाडी साठी तोंडापूर सह परिसरातून बऱ्याच दिवसापासूम ही बस सुरू व्हावी अशी अपेक्षा गजानन भक्तांची होती ती आज पुर्ण झाली . ही बस फरदापुर ,तोंडापूर, फत्तेपुर, मोताळा ,खामगाव मार्गे शेगांव अशी जाईल सोयगाव आगार प्रमुख ठाकरे साहेब यांनी पहिल्या दिवशी स्वतः प्रवास केला गाडीचे वाहक जयराम सूर्यवंशी ,चालक रमेश पायघन यांचे कुंभारी बु ,तोंडापूर ,व ढालसिंगी येथे गजानन भक्तांनी या गाडीचे स्वागत करून चालक व वाहक यांचा टोपी रुमाल देऊन स्वागत केले ही गाडी सुरू झाल्याने परिसरातील गजानन भक्त ,प्रवासी यांची चांगली सोय झाल्याने आनंद व्यक्त होत आहे .