ग्रेट मराठी न्युज(GM NEWS ), हाक तुमची साद आमची वृत्त : सणासुदीच्या काळात जामनेर बस आगाराने पुण्यासह सुरत कल्याण नंदुरबार जादा बस सेवा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी.

0
45

जामनेर ,दि.४( मिलींद लोखंडे ) : –

     दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर जामनेर बस आगाराने पुणे,सुरत कल्याण,ठाणे, नंदुरबार येथे जाणाऱ्या येणाऱ्या बस फेऱ्या वाढविण्याची जोरदार मागणी प्रवाशां कडुन होत आहे.

          जामनेर शहरात मध्यवर्ती बस स्थानक असुन येथुन ये-जा करणाऱ्या प्रवांशी संख्या प्रचंड आहे . त्यामुळेच हे बस स्थानक उत्पनासह इतर सर्व सोयी सुविधांच्या बाबतीत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. येथुन सद्य स्थितीत लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जामनेर – पुणे मुक्कामी ४ बसेस सुरु आहेत तर जामनेर – कल्याण जाणारी एक बस सुरु आहे आणी सुरत येथे २ बस सुरु आहे सोबतच नंदुरबार जाणारी १ बस सुरु आहे. सुरु असलेल्या या बस सेवेंचा लाभ प्रवाशी मोठ्या आनंदाने घेऊन त्यांच्या इच्छीत ठीकाणी जात – येत आहेत. परंतु सणासुदीचा काळ आणी वाढती लोकसंख्या यामुळे प्रवाशी संख्या सुध्दा खुप वाढली आहे . शासनाने वयोवृद्ध नागरीकांना अमृत महोत्सव योजना प्रवास सेवा मोफत केली आहे त्या बरोबरच महिलांना ५० % प्रवास भाड्याची सवलत देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे त्यामुळे महिला प्रवांशांची संख्या वाढली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता जामनेर आगाराने पुणे, कल्याण, सुरत, नंदुरबार जादा बस सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे .