GM NEWS , गुन्हे वार्ता : पहूर पोलिसांचे पाळधी आणि चिलगाव येथील दारु अड्यांवर छापे ; तीन जण अटकेत ;गुन्हा दाखल . पोलीसांच्या कारवाईचे कौतुक ; पहूर येथे कारवाईची मागणी .

0
731

पहूर , ता .जामनेर दि . २५ ( शंकर भामेरे ) : -जामनेर तालुक्यातील पाळधी आणि चिलगांव येथे पहूर पोलिसांनी आज गुरुवारी दारू अड्ड्यावर छापा टाकून ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाळधी गावात छाडेकर गल्लीत गुप्त माहितीच्या आधारे गावढी हातभट्टीची तयार १७लिटर तयार दारू ( १८०० रु . किमतीची ) नष्ट केली . या प्रकरणी
सचिन छाडेकर रा. पाळधी यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी, ईश्वर देशमुख होमगार्ड इंगळे, जाधव, दांडगे यांच्या पथकाने सदर कारवाई केली .
तसेच पोलीस निरीक्षक राहुल खताळ ,पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे , जितूसिंग परदेशी , होमगार्ड शंकर भोई , कलीम शेख मोमीन यांच्या पथकाने आज पहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिलगाव शिवारात तलावाकाठी झाडाझुडुपांमध्ये दोन ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून मध्य साठा असलेले ११ पत्री ड्रम , १० हजाररुपये किमतीची गावठी हातभट्टीची शंभर लिटर तयार दारू तसेच २२ हजार रुपये किमतीचे दारूचे कच्चे -पक्के २२०० लिटर रसायन , असे एकूण ३२ हजार रुपयांची गावठी दारू नष्ट करून-
शकलाल सांडु तडवी (रा. चिलगाव )हुसेन सरदार तडवी (रा. चिलगाव )
यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पहूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहूल खताळ व त्यांचा पथकाने केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे .पहूर परिसरात बिनदिक्कीतपणे उघड्यावर होत असलेल्या अवैध दारू विक्री मुळे अनेक तरुणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत . काही जणांना तर आपल्या प्राण्यांनाही मुकावे लागले आहे .परिणामी त्यांची कुटुंब उघड्यावर आले आहे . तरुण मुलेही दारूच्या व्यसनाच्या आहारी जात आहेत .दारूच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्या हातून नकळत इतर गुन्हे घडतांना दिसतात . त्यामुळे राजरोसपणे सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे .