GM NEWS,UPDATE: दि.26, मार्च 2021:जामनेर तालुक्यात काल रात्री उशीरा व आज दुपार पर्यंत प्राप्त झालेल्या अहवाला नुसार 147 पॉझीटीव्ह रुग्ण आढळले. ( ग्रामीण –127 , शहर –20 ).

0
428

जामनेर दि.26( मिलींद लोखंडे ) : –
जामनेर तालुक्यात काल रात्री उशीरा व आज दुपार पर्यंत प्राप्त झालेल्या अहवाला नुसार आज जामनेर तालुक्यात एकूण 147 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.यामध्ये जामनेर शहरामध्ये 20 रुग्ण आढळून आले. ग्रामीण भागात 127 रुग्ण आढळुन आले.
जामनेर तालुक्यात एकुण 1212 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून जामनेर मध्ये 303 ग्रामीण भागातील 909 रुग्ण आहेत.
यापैकी 100 रुग्ण कोव्हिडं केयर सेंटर पळासखेडा येथे दाखल आहेत व 50 रुग्ण हे उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे दाखल आहेत त्यापैकी 50 रुग्णांना ऑक्सिजन ची गरज भासत आहे.
19 रुग्ण जळगांव येथे खाजगी दवाखान्यात दाखल आहेत.
तर 1043 रुग्ण हे होम कोरन्टीन आहेत.
जामनेर तालुक्यात संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोव्हिडं हॉस्पिटलमधील बेड उपलब्ध नाही.
तरी सर्व नागरिकांनी कोव्हिडं नियमांचे पालन करावे.
पॉझिटिव्ह व्यक्ती बाहेर फिरण्याचा धोका लक्षात घेता
आपल्या आसपासचा व्यक्ती हा कोरोना पॉझिटिव्ह आहे असे गृहीत धरून सोशल डिस्टनसिंग, मास्क चा वापर,वारंवार साबणाने हात धुणे ,गर्दीत न जाणे या कोव्हिडं नियमांचे पालन करावे.
म्हणजे आपण स्वतः तरी कोरोना पासून आपला बचाव करू शकतो. यात्रा,बाजार, नवस,यामध्ये सहभागी होऊ नये.
25 लोकांपेक्षा पेक्षा जास्त लोक लग्न/निधन/किंवा धार्मिक विधीसाठी एकत्र येऊ नये.नियमापेक्षा अधिक लोकांचा कार्यक्रम असल्याचे आढळून आल्यास शहरी भागात नगरपालिका व ग्रामीण भागात ग्रामसेवक यांना तात्काळ सूचित करावे.
प्रत्येक आजारी व्यक्तीने तसेच साधी लक्षणे जरी असले तरी किंवा पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी.
जामनेर तालुक्यात सर्व शासकीय रुग्णालयात तसेच खाजगी रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर यांच्या दवाखान्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या/ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्तीत,जामनेर नगरपालिकेकडून वार्ड निहाय व जास्त संसर्ग असलेल्या गावात ग्रामसेवक व सरपंच याच्या कडून कोरोना कॅम्प चे आयोजन करून “मोफत कोरोना” चाचणी करण्यात येतात तरी नागरिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभाग व प्रशासनाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांच्या कडून नागरिकांना करण्यात येत आहे.