GM NEWS , दबंग कारवाई वृत्त : पहूर पोलिसांची अवैध दारू विक्री विरुद्ध मोहीम . चिलगाव -पाळधी नंतर आज फत्तेपुर -वाकडी परिसरात दारू अड्डे उध्वस्त .

0
398

पहूर , ता . जामनेर , दि . २६( शंकर भामेरे ) पहूर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडली असून आज शुक्रवारी फत्तेपुर आणि वाकडी परिसरात दारू भट्ट्या उद्ध्वस्त केल्या .कालच चिलगाव आणि पाळधी भागात दारू अड्यांवर छापे टाकण्यात आले होते .
दारूच्या व्यसनामुळे अनेक तरुणांचे संसार उद्ध्वस्त होत असून दारू विक्रीवर प्रतिबंध आणण्यासाठी पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे .
आज 26 मार्च रोजी पहुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत फत्तेपुर गावा जवळील नाल्याकाठी झाडाझुडुपांमध्ये एका ठिकाणी मद्य साठवलेले ३ फायबर ड्रम्स ६०० लिटर दारू तसेच ६००० रुपये किमतीचे दारूचे कच्चे पक्के रसायन व २० लिटर २००० रुपये किंमतचे गावठी हातभट्टीची तयार दारू एकून किंमत ८००० रुपये किमतीची मिळून आल्याने जागीच नष्ट केले .याप्रकरणी नबाब बुधन तडवी रा. फत्तेपुर आरोपी यांच्याविरुद्ध पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . पोलीस निरीक्षक राहुल खताळ, जितुसिंग परदेशी होमगार्ड शंकर भोई, होमगार्ड कलीम शेख मोमीन, होमगार्ड राजेंद्र राऊत, देवा इंगळे या पथकाने कार्यवाही केली आहे .
तसेच आजच पहुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाकडी गावा जवळ तलावा काठी झाडाझुडुपांमध्ये दोन ठिकाणी १पत्री व ४ फायबर ड्रम ८०० लिटर गावठी हातभट्टीची आठ हजार रुपये किमतीची दारू व कच्चे -पक्के रसायन तसेच २० लिटर २००० किंमतचे गावठी हातभट्टीची तयार दारू एकून किंमत १० हजार रुपये किमतीची दारू जागीच नष्ट करण्यात आली .याप्रकरणी नूरखा पीरखा तडवी (रा.वाकडी )
यांच्याविरुद्ध पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल खताळ, जितुसिंग परदेशी होमगार्ड शंकर भोई, होमगार्ड कलीम शेख मोमीन, होमगार्ड राजेंद्र राऊत, देवानंद इंगळे यांच्या पथकाने सदर कारवाई केली .पहूर पोलिसांनी सुरु केलेल्या मोहिमेचे कौतुक होत आहे मात्र स्थानिक अवैध व्यावसायिकांच्या पोलीस कधी मुसक्या आवळणार ? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमधून चर्चिला जात आहे .