राज्यात काँगेस- राष्ट्रवादीचे ४० आमदार सुद्धा निवडुन येणार नाहीत. – ना.गिरीष महाजन. (व्हीडीओ पाहण्यासाठी लिंक ओपन करा )https://youtu.be/5XAhOGvC72o

0
233

नगर दि .४ ( प्रतिनिधी ) : – राज्यातील जनतेने भाजप सरकारच्या विकासाला प्रचंड प्रतिसाद दिला असुन या विधानसभा निवडणुकी मधे कॉंग्रेस -राष्ट्रवादीचे ४० उमेदवार सुध्दा निवडुन येणार नाहीत असा ठाम विश्वास नामदार महाजन यांनी व्यक्त केला आहे .नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज ना .महाजन यांच्या उपस्थितीत भरण्यात आला, यानंतर माध्यमांशी बोलताना ना.महाजन यांनी हे वक्तव्य केले आहे .

-अजित पवारांच्या नाराजी मागे वेगळेच कारण..!
– राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार बावीस तास गायब होते, त्यावरून नक्कीच पवार परिवारात सगळं आलबेल नसल्याची शक्यता महाजन यांनी व्यक्त केली. अजित पवार यांनी आपल्या काकांमागे ईडी मुळे झालेल्या त्रासातून आपण नाराज झाल्याची सारवासारव केली असली तरी खरे कारण वेगळेच असावे असहीे ना.महाजन प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले..