GM NEWS , आंदोलन वृत्त : नांदेड येथे पोलिसांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या वतीने जाहीर निषेध . ६ एप्रिल रोजी नांदेड येथे होणाऱ्या महारॅलीत सहभागी होण्याचे अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटनेचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ भाऊ सुरळकर यांचे आवाहन .

0
30

जामनेर ,दि .१( मिलींद लोखंडे ) : –
अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या वतीने दि.29/03/2021 रोजी नांदेड येथे पोलीसांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात व्यक्त करण्यात आला आहे.
पोलीस बांधवांवर होणाऱ्या प्राणघातक हल्ल्यांच प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज आपण सर्व नागरीक ज्या पोलीस बांधवांमुळे सुरक्षीत राहू शकता. अश्या पोलीस बांधवावरच आपण प्राणघातक हल्ले करणे म्हणजे समाज विघातक व घृणास्पद कृत्य आहे.
कोणताही धर्म हिंसा करण्याची शिकवण देत नाही.
एखादा धर्म अशी शिकवण देतच असेल तर तो नक्कीच राक्षसी धर्मच असावा. एखादया धर्माला शस्त्र बाळगण्याची आपल्या कायदयाने संमती दिली असेल तर ती फक्त आत्म संरक्षणासाठी आहे.. ना की त्या शस्त्रांचा बेछूट वापर करत इतरांचा नाहक जीव घेण्यासाठी. खरे तर आपल्या देशात लोकशाही आहे. इथे सर्वांना कायदे समान आहेत. जर शस्त्र बाळगण्याची सवलत द्यायचिच असेल तर सर्वांना द्यावी अन्यथा कुणाला ही ती देण्यात येऊ नये. एकंदरच नांदेड येथे घडलेली घटना ही संविधानाचा अपमान करणारी आहे. या घटनेचा मी संघटनेच्या वतीने तीव्र विरोध करतो असे संघटनेचे प्रवक्त्यांनी सांगीतले .हा विरोध व निषेध दर्शवण्यासाठी तसेच पोलीस बांधवाना पाठींबा देण्यासाठी नांदेड येथे दि.06/04/2021 रोजी राज्य शासनाने व स्थानिक जिल्हा प्रशासनाने कोविड च्या संदर्भात दिलेल्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करून, सामाजिक अंतर व मास्क चा १००% वापर करून महारॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे व या वेळी या महारॅलीस संघटनेचे राज्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे .
संघटनेने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की , आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना व जनतेला आवाहन करत आहोत की ,दि.06/04/2021 रोजी नांदेड येथे होणाऱ्या महारॅलीत सहभागी होऊन आपल्या पोलीस बांधवांना प्रोत्साहन व धीर द्यावा..
अधिक माहिती साठी संपर्क साधावा. मोबाईल नंबर ९३७०९५६७०५
विश्वनाथ भाऊ सुरळकर अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षक संघटना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष.