GM NEWS, गुन्हे वार्ता : पहूर येथे कॉपर वायर बंडलची चोरी . चोरलेले वायर बंडल परस्पर विक्री करताना पोलीसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या .

0
199

पहूर , ता जामनेर , दि. १ ( शंकर भामेरे ) : – चोरलेले १५ हजार रुपये किंमतीचे कॉपर वायर बंडल परस्पर विक्री करताना पोलिसांनी आरोपीस रंगेहात पकडले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,पोलीस स्टेशन भाग 5 गुन्हा रजिस्टर नंबर 103 /2021 भादवि कलम 461 ,380 प्रमाणे दाखल असून यातील फिर्यादी अतुल अरुण पाटील राहणार सुनसगाव तालुका जामनेर यांनी फिर्याद दिली कि दिनांक 31 /3/ 2021 चे रात्री 20 वाजे पासून ते दिनांक 1/4 /2021 चे सकाळी आठ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने पुलाजवळील पत्राचा शेड मधून पंधरा हजार रुपया किमतीचे कॉपर वायर बंडल चोरून नेले बाबत फिर्याद दिल्यावरून वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शशिकांत पाटील याचे कडेस दिला सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गोपनीय बातमीदार बातमीदार मार्फत माहिती मिळाली की वाकोद रोडवर दर्गा जवळ एक इसम फेरीवाला भंगारवाला यास कॉपर वायर तार विकत आहे अशी बातमी मिळाल्याने पोलीस हेडकॉन्स्टेबल शशिकांत पाटील पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल अनिल देवरे अशांना रवाना केले बातमीप्रमाणे एक इसम भंगार विक्रेत्याला तांब्याची तार विकताना मिळून आला . त्यास नाव विचारता त्याने त्याचे नाव गणेश माधव सोनवणे वय 20 राहणार म्हाडा कॉलनी पहुर व भंगार घेणारा यास नाव विचारता त्याने त्याचे नाव आत्माराम तुकाराम देहाडे वय 50 राहणार वाकोद तालुका जामनेर असे सांगितले सदर तांब्याची तार बाबत गणेश सोनवणे यास विचारपूस करता कॉपर केबल चे बंडल तुला जवळून पत्री शेड मधून चोरून ते बंडल जाळून त्याची तार विक्री करण्यासाठी आणली असा कबुली जबाब दिला . त्यावरून वर नमूद आरोपी त्यांना अटक करून पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शशिकांत पाटील हे करीत आहेत .