GM NEWS, UPDATE: जामनेर तालुक्यातील ढालसिंगी येथे कोरोना तपासणी शिबीर संपन्न.

0
448

ढालसिंगी,ता- जामनेर,दि. 7 ( संभाजी गोतमारे ) :-
उपकेंद्र ढालगाव अंतर्गत ढालसिंगी येथे करोना चा वाढता प्रादुर्भाव बघता व गावात करोना रुग्ण आढळल्याने मा.डॉ. राजेश सोनवणे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करोना चाचणी शिबीर ठेवण्यात आले.यात एकूण २५ तपासण्या करण्यात आल्या त्यापैकी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.तसेच गावातील नागरिकांना मास्क चा वापर करणे,हात स्वच्छ धुणे तसेच सामाजिक अंतर पाळणे याविषयी सूचना करण्यात आल्या.तसेच नागरिकांना जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी डॉ.विवेक जाधव,आरोग्य सेवक मनोज परदेशी,ग्रा.पं. सदस्य संभाजी गोतमारे,आशा सेविका कांताबाई गोतमारे,अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच जि. प. शिक्षक माळी सर उपस्थित होते.