GM NEWS HEIPING HANDS: आवाहन वृत्त : साडेतीन वर्षीय चिमुकल्या अंध आरोहिच्या नेत्र शस्त्रक्रियासाठी दानशुरांनी मदतीचा हात देण्याची गरज . जन्मत: च अंध असलेल्या आरोहीची सुंदर जग पाहण्याची धडपड .

0
353

डहाणु, दि .९(मिलींद लोखंडे ) : –
‘सुंदर सृष्टी पाहण्या मज
नाही मिळाले नेत्र
मदत आपण करूनी मजला
कार्य करावे पवित्र ‘
ही ह्रदयस्पर्शी हाक आहे जन्मत:च अंध असलेल्या कुमारी आरोही कमलेश उंबरसाडा या साडेतीन वर्षाच्या चिमुरडीची. आदिवासी पाड्यावर राहणारे आई-वडील अशिक्षित आणि त्यात अठराविश्वे दारिद्र्य त्यामुळे चिमुकल्या आरोहीला या सुंदर सृष्टीचे सौंदर्यआपल्या डोळ्यात साठवता यावं यासाठी आपली मदत लाख मोलाची आहे . GM NEWS HELPING HANDS च्या माध्यमातून आरोहीचा जीवन जगण्याशी असलेला संघर्ष संवेदनशीलतेने मांडण्याचा केलेला एक प्रयत्न ..!
आरोही कमलेश उंबरसाडा आसवाली राऊत पाडा या चिमुकलीचा 22 /9/ 2017 रोजी जन्म झाला .साडेतीन वर्षांची चिमुकली आरोही मात्र जन्म झाल्या पासुन आज पर्यंत हे सुंदर जग पाहू शकली नाही . नव्यानेच निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील डहाणु तालुक्यातील राऊतपाडा या अदिवासी पाड्यावर राहणाऱ्या आरोहीचे आई वडील अशिक्षित आहेत . मोलमजुरी करून रोज उदरनिर्वाह करणे हाच त्यांचा दिनक्रम …त्यातच घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्याने त्यांनी आतापर्यंत डॉक्टरांकडे जाऊन मुलीच्या उपचारासाठी इच्छा असूनही धाडस केले नाही .आपल्या चिमुकलीला आज ना उद्या दृष्टी मिळेल, या भावड्या आशेवर आरोहीची आई आलेला दिवस कसाबसा ढकलत आहे . जामनेर तालुक्यातील कसबा पिंप्री येथील मुळ रहीवाशी आणि डहाणु तालुक्यात शिक्षक असलेले विनोद सुरवाडे सर यांनी या अंध आरोहीला बघीतले त्यानंतर येथे अंगणवाडी सेविका असणाऱ्या संगीताई यांच्याशी संपर्क साधुन तिची माहिती घेतली . मानवतेच्या दृष्टिकोनातुन
आरोही च्या आई-वडिलांशी त्यांनी संपर्क केला असता तिचा एक डोळा जन्मतः बंद आहे ,तर दुसऱ्या डोळ्यांनीही ती पाहू शकत नाही असे त्यांनी सांगीतले . असेल दृष्टी तर दिसेल सृष्टि असं म्हणतात .याच आशेने जरी तीला दृष्टी नसली तरी तीलाअंगणवाडीत पाठवून तिला पुढे शिक्षण देण्याचा आई-वडिलांचा खटाटोप नक्कीच संवेदनशील मनाला मनाला चटका लावून जातो .
आई वडील मजुरी करून एकुलत्या एक मुलीला प्रेमाचे दोन घास भरवतात …आणि परमेश्वर आपल्या मुलीला दृष्टी देईल या आशेवर आई-वडील उगवत्या सूर्याकडे डोळे लावून पाहतात .
विनोद सुरवाडे यांना
GM NEWS HELPING HANDS या उपक्रमा बद्दल माहिती असल्याने त्यांनी आमचाशी संपर्क साधून या चिमुकलीला काही मदत करता येईल तर बघा ही आर्त हाक दिली त्या नुसार आम्ही GM NEWS HELPING HANDS या उपक्रमाच्या माध्यमातून आपणास विनम्रपणे आवाहन करतो की , चिमुकल्या आरोहीच्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी ज्यांना काही मदत करायची असेल त्यांनी कृपया पुढे यावे आणि अंध असलेल्या या चिमुरडीला हे सुंदर जग पाहण्यासाठी मदत करावी ही नम्र विनंती.
आरोही हीच्या आई वडीलां जवळ संपर्का साठी मोबाईल नसल्याने आपण येथील शिक्षक दस्तगिर घूणकी सर  मो . क्रं -8007243600 जि प शाळा खुणावडे ता डहाणू आणि विनोद सुरवाडे संपर्क क्रमांक – 7744077277 यांच्यासह येथील
अंगणवाडी सेविका संगीताताई यांच्याशी संपर्क साधावा .