GM NEWS ,Big Breaking: क्रुरकम्र्यांच्या हल्ल्यात नगरसेवक रविंद्र खरात यांच्यासह कुटुंबातील तीघांचा मृत्यु.पत्नीसह एक मुलगा गंभीर. ( घटना स्थळाचा व्हीडीओ » GM News Jamner युट्युबर चॅनेलवर ))

0
1191

भुसावळ  दि .७ ( प्रतिनिधी ) :– शहरात नगरसेवक रवींद्र खरात यांच्या संपूर्ण कुटुंबावर काही अज्ञात क्रूरकम्र्या आरोपी कडून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे . तर नगरसेवक रविंद्र खरात यांचा सुध्दा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती समोर येत आहे .

भुसावळ चे नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या खरात यांच्या दोन्ही मुलांसह मोठ्या बंधुवर काही अज्ञात आरोपींनी गोळीबार तसेच चाकूने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली .हल्ल्यानंतर हल्लेखोर लागलीच पसार झाले या घटनेमुळे भुसावळ शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे .मृतांमध्ये स्वतः नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह मुलगा रोहित उर्फ सोनू मुलगा प्रेमसागर तसेच मोठे बंधू सुनील बाबुराव खरात यांचा समावेश आहे हल्लेखोरांनी थेट कुटुंबावर हल्ला चढवल्याने खळबळ उडाली आहे .दरम्यान नगरसेवक रवींद्र खरात यांच्या पत्नी रजनी खरात आणि लहान मुलगा रितेश खरात यांच्यावर सुध्दा हल्ला झाल्याची माहिती असून त्यांना उपचारार्थ गोदावरीत हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे . त्यांचा सुद्धा प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे . खरात कुंटुंंबावर हल्ला केल्या नंतर हल्लेेखोर घटना स्थळाव पसार झाले आहेत .