GM NEWS, BREAKING: शासनाने निर्देशित केलेल्या कोव्हिडं नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी डॉक्टरवर जामनेर तालुक्यातील नेरी येथे कारवाई.

0
1669

जामनेर,दि. १३ ( मिलींद लोखंडे ) : –
जामनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसात झपाट्याने वाढत होती.यामध्ये काही कोरोना रुग्णांचा मृत्यू सुद्धा झाला होता.सदर मृत्यूचे सर्वेक्षण करण्यासाठी तहसीलदार अरुण शेवाळे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती ची स्थापना केली होती. समितीच्या सर्वेक्षणातुन असे लक्षात आले की कोरोना चाचणी न करता स्थानिक पातळीवर टायफाईड सांगून अधिक प्रमाणात सलाईन लावण्यात आल्यामुळे काही रुग्णांना जीव गमवावा लागला. सदर घटनेची दखल घेऊन तहसीलदार यांनी खाजगी डॉक्टर व लॅब यांना टायफाईड च्या रुग्णाची आर टी पी सी आर तसेच अँटीजन चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सदर नियमांचे पालन काही ठिकाणी होत नाही व काही पॉझिटिव्ह रुग्णांना काही डॉक्टर कोव्हिडं सेंटर ची परवानगी नसतांना अधिक प्रमाणात सलाईन लावत असल्याची माहिती समोर आली.या माहितीच्या आधारे आज नेरी दिगर येथील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉ. दिलीप साबळे यांच्यावर नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी पथकासह अचानक भेट दिली व आढळून आलेल्या अनियमिततेबाबत त्यांना नोटीस बजाबण्यात आली.वैद्यकीय पथकात डॉ.सारिका भोळे, डॉ.नामदेव पाटील,
एस.एस.बाविस्कर,एस.के.कोळी,विजय पवार, उषा धांडे व सर्व आशा स्वयंसेविका उपस्तीत होत्या.