सिद्धगड भवानी मातेला ना.गिरीष महाजनांनी फोडले प्रचार नारळ.

0
346

जामनेर ,दि .७ (विलास ढाकरे ) : – जामनेर विधानसभा मतदार संघाचा प्रचाराचा नारळ वाघारी-बेटावद जि.प.गटातील सिद्धगड भवानी मंदिर येथे ना.गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते आज फोडण्यात आले.यावेळी जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन,जि.प.सदस्या सौ.सुनीताताई विलास पाटील, पं.स.सभापती सौ.निताताई कमलाकर पाटील, जे.के.चव्हाण साहेब,पं.स.सदस्य रमणदादा चौधरी,नवलभाऊ पाटील, जितूकाका पाटील, कमलाकरभाऊ पाटील, गटातील ज्येष्ठ कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानंतर काळखेडा, सारगाव, टिघ्रा, वडगाव, मोयखेडा, देवळसगाव, बेटावद खु, वाघारी, पाटखेडा, वाडीकिल्ला, मालदाभाडी येथे मोठ्या जल्लोषात प्रचार करण्यात आला.