GM NEWS, हृदयद्रावक घटना: जामनेर तालुक्यातील पहूर येथे पतंजली आरोग्य केंद्रास आग ; तरुण व्यवसायीकाचे दिड लाखाचे नुकसान.

0
256

पहूर , ता .जामनेर दि . २८ ( शंकर भामेरे ) : – जामनेर तालुक्यातील पहुर बस स्थानक परिसरात असलेल्या पतंजली आरोग्य केंद्रात शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दीड लाखाचे नुकसान झाल्याची दुर्घटना आज दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली .
या बाबत अधिक माहिती अशी की , बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कृषी पंडित मोहनलाल लोढा कॉम्प्लेक्स मधील जयंत जोशी यांच्या ज्ञानेश्वरी पतंजली आरोग्य केंद्रास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली . दुकान बंद करून ते बाहेर गेले असता शेजारील कृषी केंद्र संचालक श्री .गाजरे यांना त्यांच्या दुकानातून धुर निघत असल्याचे दिसले . त्यांनी श्री . जोशी यांना फोन आला असता विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचे निदर्शनास आले . श्री गाजरे सतीश पाटील यांच्यासह आजूबाजूच्या लोकांनी आग विझविण्यासाठी मदत केली .
या आगीत १९ हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह आयुर्वेदिक औषधांचा ९५ हजार ३९५ रुपयांचा साठा जळून भस्मसात झाला . तसेच दुकानातील काउंटर व इलेक्ट्रॉनिक उपकरण यांचेही नुकसान झाले .घटनेची माहिती मिळताच संतोष चौधरी आणि श्रीराम धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला .याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यातजयंत जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीड हवालदार संतोष चौधरी करीत आहेत . लॉकडाऊनमुळे आधीच सर्वच समाज घटकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असतानाच या शार्ट सर्कीट मुळे आगीत झालेल्या नुकसानीमुळे श्री .जोशी यांना आर्थिक फटका बसला आहे .