GM NEWS,प्रेरणादायी वृत्त : जामनेर तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी – कार्यकर्ते एकवटले . स्थानिक नागरिकांना कोरोना लस मिळण्याची सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली एकमुखी मागणी . पक्षीय मतभेद दूर ठेवत तहसीलदारांना दिले निवेदन .

0
831

जामनेर दि . ९ ( मिलींद लोखंडे ) : – जामनेर तालुक्यासह शहरातील स्थानिक रहिवाशांना प्राधान्याने कोवीड प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तहसीलदार अरुण शेवाळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे आज केली आहे . कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नाव नोंदणी मुळे इतर तालुक्यासह इतर जिल्ह्यातील नागरीक जामनेर तालुक्यात येत आहेत . त्यामुळे कोरोना लसीकरण केंद्रावर स्थानिक नागरीकांना लस घेण्यासाठी अडचण येत आहे .
कोवीड नियंत्रणासाठी लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने जामनेर तालुक्यातील स्थानिक नागरिकांना प्राधान्याने प्रतिबंधात्मक लस देऊन त्यांचे लसीकरण करण्याच्या मागणीचे निवेदन जामनेर शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दिले आहे .पक्षीय मतभेद दूर ठेवत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , covid 19 चीलस मोहीम सुरू झाली असून आम्ही सर्व पक्ष पदाधिकारी आपणास अर्ज करतो कि जामनेर तालुक्यातील रहिवाशांना प्राधान्याने लक्ष देण्यात यावी ही नम्र विनंती तसेच कायदा व सुव्यवस्थेची संदर्भात प्रश्न निर्माण होऊ नये याकरता अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देण्यात यावा .
या निवेदनावर चंद्रकांत बाविस्कर , पप्पू पाटील, अतिश झाल्टे , अॅड . भरत पवार ,अतुल सोनवणे ,ज्ञानेश्वर जंजाळ , विशाल पाटील , प्रल्‍हाद बोरसे , रवींद्र झाल्टे ,संदीप हिवाळे , मिना शिंदे , नटवर चव्हाण , सागर पाटील , सुरेश चव्हाण, सुहास पाटील ,डॉ.संजीव पाटील ,कैलास पालवे, दीपक बिंदवाल ,नसीम शेख ,बाबुराव हिवराळे ,बंटीभाऊ वाघ आदी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या आहेत .