ग्रेट मराठी न्युज(GM NEWS),दखल बातमीची : सणासुदीच्या काळात जामनेर बस आगाराने सुरु केल्या लांब पल्ल्याच्या नविन बस फेर्‍या. प्रवाशांनी व्यक्त केले समाधान !

0
31

जामनेर,दि. ९( मिलींद लोखंडे ): – दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता जामनेर बस आगाराने पुणे, सुरत, कल्याण, नाशिक,ठाणे, नंदुरबार येथे जाण्यासाठी लांब पल्ल्याच्या नविन गाड्या सुरु करण्याची जोरदार मागणी प्रवाशांनी केली होती. आमच्या ग्रेट मराठी न्युज (GM NEWS )ने जनसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी आपल्या या बिरुदावली नुसार या संदर्भात दि.४ नोव्हे रोजी ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते.या वृत्ताची तात्काळ दखल घेत जामनेर बस आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. कमलेश आत्माराम धनराडे यांनी लांब पल्ल्यांच्या नियमित बस फेर्‍यांसह काही नविन बस फेऱ्या सुरु केल्या आहेत.

         जामनेर आगार येथुन पुढील प्रमाणे नियमीत आणी नविन बस फेर्‍या सुरु करण्यात आल्या आहेत.

सुरत-सकाळी ७.३०,९.००(नवीन सुरू)

पुणे-८.००,१०.००,१०.३०,११.००(शिवशाही).

नवीन सुरू करण्यात आलेल्या – १२.००,१२.३०,१३.३०,२०.३०(१३ ता पासून)

कल्याण-७.४०(नवीन सुरू)

ठाणे – ८.३० ( नविन )

नाशिक- १०.३०,११.३०, ५.३० (नवीन सुरू)

नंदुरबार-१२.००

नविन सुरू करण्यात आलेल्या – ६.००,१३.०० नंदुरबार

या सोबतच वरीष्ठांच्या आदेशान्वये अजुन काही लांब पल्ल्यांच्या नविन बस सुरु होणार असल्याची माहिती आगार प्रमुख श्री. कमलेश आत्माराम धनराडे यांनी दिली आहे. प्रवाशांची मागणी तात्काळ मान्य करून त्याची अंमलबजावणी सुद्धा तात्काळ केल्याने प्रवाशी बांधवांनी आगार व्यवस्थापक श्री. कमलेश आत्माराम धनराळे यांच्याह सर्व अधिकारी,कर्मचारी वाहक चालक यांचे आभार मानले आहेत.


४ नोव्हें रोजी प्रसिद्ध केलेले वृत्त