GM NEWS , Big Breaking: सोशल मिडीयामुळे आईला सापडला मुलगा. पहुर पोलीसांनी घडवले माणुसकीचे दर्शन .

0
138

पहूर , ता . जामनेर दि .१२(संतोष पांढरे ) : – पहूर येथील शिवनगर भागात राहणाऱ्या इसमास पाचोरा रेल्वे स्थानकावर बेवारस अवस्थेत सापडलेल्या चिमुकल्याच्या आई – वाडिलांचा शोध लागलेला असून तो चिमुकला वाशी येथील असल्याचे चौकशीतून समोर आले आहे .पहूर पोलीसांनी सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करून चिमुकल्याच्या आई – वडिलांचा शोध घेत माणूसकीचे दर्शन घडविले आहे .

पहूर येथे शिवनगर वस्तीत राहणाऱ्या एका इसमाकडे कोणीतरी लहान मूल असल्याच्या माहीती वरून सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी , सहाय्यक फौजदार अनिल अहिरे यांनी चौकशी करून मुल ताब्यात घेतले . संबधीत इसमास हे मूल पाचोरा रेल्वे स्थानकावर बेवारस असल्याचे आढळून आल्याने त्याने आपल्या घरी आणले . सदर मुलाचा फोटो आणि संपर्क क्रमांक व्हॉट्स अॅप गृप, फेसबुक वर व्हायरल झाल्यामुळे अवघ्या दोन तासात बालकाच्या आईचा शोध घेणे शक्य झाले . श्री . परदेशी यांनी मुंबई विभाग पोलीस गृप वर सदर संदेश पाठविताच वाशी येथील पोलीस उपनिरीक्षक गोविंद कोळीवाल यांनी पहूर पोलीसांशी संपर्क केला . सदर फोटोतील मुलगा आपलाच असून तो पहूर पोलीसांकडे सुरक्षीत असल्याचे समजताच ‘ त्या ‘ मातेचा आनंद गगनात मावेनासा झाला . सदर मुल आज रोजी श्री . अहिरे यांच्या घरी असून त्यास घेण्यासाठी त्याचे पालक मुंबईहून पहरकडे रवाना झाले आहेत . उद्या सकाळी त्यास पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे .मतदानाच्या कामांमुळे वाढलेल्या ताण -तणावातून पहूर पोलीसांनी घडविलेल्या माणुसकिच्या दर्शनाने सर्वत्र कौतूक होत आहे .