GM NEWS,BREAKING : पहूर – पाळधी दरम्यान बिबट्याचा वावर . सोनाळे येथील शिक्षकासह दोन जणांवर हल्ला . वनविभागाचे अधिकारी -कर्मचारी ‘वेट अँन्ड वॉच’च्या भूमिकेत .

0
4083

                 -जाहिरात –    


पहूर ,ता .जामनेर , दि . २ २ ( शंकर भामेरे ) : – जामनेर तालुक्यातील पहूर – पाळधी – सोनाळे शिवारात आज दुपारी बिबट्याने एका शिक्षकासह अन्य एका व्यक्तीवर हल्ला केल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत .

डॉ .सागर गरुड हे प्रवास करत असतांना त्यांना दुपारी २ वाजेच्या सुमारास बिबट्या दिसल्याचे त्यांनी सांगीतले . डॉ गरुड यांनी त्वरीत वनविभागाशी संपर्क साधला .
जामनेरचे वनक्षेत्रपाल समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली , वनपाल संदीप पाटील , पी . व्ही महाजन वनपाल गोद्री , प्रसाद भारुडे , वनरक्षक पहूर , ए .एस ठोंबरे , वनरक्षक , जामनेर , संदीप पाटील , वनरक्षक गोरताळा , वनरक्षक कोळी , कर्मचारी – जीवन पाटील , गोपाल शिसोदे , भुरा जोगी , ईश्वर पारधी यांचे पथक घटनास्थळी तळ ठोकून आहेत .
वनविभागाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बिबट्याला पकडण्यासाठी कर्मचारी अधिकारी ‘ वेट अॅन्ड वॉच’ च्या भुमिकेत आहेत .