GM NEWS :गुन्हे वार्ता : जामनेर तालुक्यातील पिंपळगाव येथे गावठी दारू भट्टी उद्ध्वस्त . पहुर पोलिसांची कारवाई .

0
565

पहूर , ता . जामनेर ,दि . २२( शंकर भामेरे ) :- जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पिंपळगाव कमानी येथे गावठी हातभट्टीच्या दारू अड्यावर पहूर पोलिसांनी छापा मारून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
आज शनिवार दिनांक 22 मे 2021रोजी पिंपळगाव कमानी गावाला लागून असलेल्या पाटचारी जवळ वीटभट्टी पासून थोड्या अंतरावर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सिमेंटच्या टाक्यांमध्ये साठवलेले ४हजार रुपये किमतीचे २०० लिटर मद्य तसेच १ हजार रुपये किमतीचे गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन पोलिसांनी जागीच नष्ट केले . याप्रकरणी कय्यूम सलामत तडवी ( रा . पिंपळगांव )याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली भरत लिंगायत ,जितूसिंग परदेशी , रविंद्र खरे , नासीर तडवी , राजू देशमुख यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे .