GM NEWS , UPDATE : जळगांव जिल्ह्यात १५ जून पर्यंत निर्बंध वाढविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश . अत्यावश्यक सुविधा देणारी दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत राहणार सुरू . सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी बातमी लिंकला एक क्लिक करा .

0
686

जळगांव,दि . ३१ ( मिलींद लोखंडे ) : – जिल्ह्यातील covid-19 चीपरिस्थिती नियंत्रणात येत असतानाच त्यात वाढ होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी 15 मे 2021 पासून लागू करण्यात आलेले संचारबंदी सह विशेष निर्बंध 15 जून 2021 पर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेश दिले आहेत .
या आदेशान्वये अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने दररोज सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेच्या वेळेत सुरू राहतील .
स्वतंत्र ठिकाणी असलेली इतर प्रकारचे सर्व दुकाने हे केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत सुरू राहतील .
सर्व प्रकारच्या दुकानांच्या प्रवेशाच्या ठिकाणी काउंटर समोर एका वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश राहणार नाही .
दुकान मालक चालक यांनी दुकानांच्या दर्शनी भागात बँक काऊंटर प्रमाणे काच प्लास्टिकचे पारदर्शक शीट किंवा कमी खर्चात करावयाचे असेच पारदर्शक प्लास्टिक पडदा यांचा वापर करणे बंधनकारक राहील . तसेच सदर पडद्यातून केवळ ग्राहकास वस्तूंची देवाणघेवाण करता येईल एवढेच मोकळी जागा ठेवण्यात यावी .
आवश्यक वस्तू व सेवा बाबत घरपोच वितरण सुविधा या दररोज सकाळी सात ते सायं .सात वाजेपर्यंत देता येतील .
सर्व शासकीय कार्यालयात 25% उपस्थिती राहील . जळगाव जिल्हा कृषिप्रधान असल्याने मान्सूनपूर्व शेतीविषयक कामे , पेरणी, हंगाम सुरू असल्याने कृषी संबंधित सेवा पुरवणारी दुकाने हे दररोज सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सुरू ठेवता येतील .
मालवाहतूक ,कार्गो वाहतूक सुरळीतपणे सुरू राहील ,तसेच सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळे नंतर देखील दुकानात केवळ माल भरण्याकरता सुट राहील . या वेळेत दुकानातून ग्राहकास सेवा पुरवण्यात येणार नाही .
मॉर्निंग वॉक ,सायकलिंग, खुल्या मैदानातील व्यायाम या करता केवळ सकाळी 4 ते 8 या वेळेत सुट राहील.
भविष्यात जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर दहा टक्के किंवा अधिक झाल्यास व ऑक्सिजन बेडची उपलब्धी 40 टक्के पेक्षा कमी झाल्यास सदरच्या आदेशात नव्याने सुधारणा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे .