GM NEWS , FLASH पहूर परिसरात अवैध वृक्षतोड . संबंधितांवर कारवाईची मागणी.

0
325

पहूर , ता . जामनेर दि . ६( शंकर भामेरे ) : -जामनेर तालुक्यातील पहूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवैध वृक्षतोड होत असून वृक्षतोड थांबविण्याची मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केली आहे .
पहुर परिसरात अवैध रित्या सर्रास वृक्षतोड केली जात असून ट्रॅक्टरद्वारे भर बस स्थानकावरून वाहतूक केली जात असतानाही संबंधित अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे . एकीकडे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासन-प्रशासन आणि गावकरी विविध उपक्रम राबवत असताना अशा वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे . covid-19 च्या कठीण काळात ऑक्सिजनचे महत्त्व साऱ्या जगाला कळून चुकले आहे . तरीही वृक्षतोड करणे म्हणजे चुकीचेच आहे .वृक्षतोड करणाऱ्या संबंधितांवर योग्य कारवाई करून होणारी अवैध वृक्षतोड थांबवण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे .