GM NEWS , अपघात वृत्त : टायर फुटल्याने टीयागो व्हॅन दुभाजकावर धडकली; २ चिमुकल्यांसह ४ जण जखमी पहूर – वाकोद रस्त्यावर अपघात . जखमींच्या मदतीसाठी गावकरी धावले .

0
2180

पहूर ,ता .जामनेर , दि . ९ ( शंकर भामेरे ) : – पहूर कडून वाकोदकडे जाणाऱ्या टियागो व्हॅनचे टायर फुटून व्हॅन दुभाजकावर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन चिमुकल्यांसह चार जण जखमी झाले . आज बुधवारी (ता. ९ ) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पहूर -वाकोद रस्त्यावर बालाजी तोलकाट्या समोर हा अपघात झाला .
पारध (ता . भोकरदन ) येथील रहीवासी व जव्हार जि . पालघर येथील जिल्हा परिषद शिक्षक सचिन रतनसिंग काकरवार ( ३५ वर्षे) हे त्यांची पत्नी शितल काकरवार ( ३२ वर्षे ) मूले वीर ( ७ वर्षे ) आणि आयूष ( ४ वर्षे ) असे चौघेजण मिराचे पळसखेडे ( ता .जामनेर ) येथे सासुरवाडीला भेटीसाठी आले होते . भेट घेऊन आपल्या टियागो व्हॅनने (एमएच . १५ . जी एक्स ५४२६ )घराकडे परतत असताना आज दुपारी पहूर जवळील बालाजी तोलकाट्या समोर त्यांच्या टियागो व्हॅनचे टायर फुटले .त्यामुळे समोरच असलेल्या रस्ता दुभाजकावर त्यांची व्हॅन धडकून कारमधील ते चौघे जण जखमी झाले तर व्हॅनचा चक्काचूर झाला . मात्र सुदैवाने रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात व्हॅन न कोसळल्याने प्राणहाणी टळली . अपघातस्थळी गयास तडवी , अमीन पिंजारी , संदीप वेल्डींगवाले , जमील भाई वेल्डींग वाले , रविंद्र सपकाळ इरफान गॅस वेल्डींग फिरोज तडवी ,राजू तडवी आदींनी जखमींना रुग्णालयात हलण्यासाठी मदत केली . वेल्डींग कटरच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न करून जखमींना त्वरीत बाहेर काढले . घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी सहकारी संतोष चौधरी , ज्ञानेश्वर बाविस्कर , श्रीराम धुमाळ , ईश्वर देशमुख यांच्या सह घटनास्थळी धाव घेतली .
ग्रामीण रुग्णालयात डॉ. किर्ती पाटील , परिचारक दीपक वाघ ,परिचारिका स्वप्ना वंजारी ,प्रदीप नाईक यांनी रुग्णांवर तातडीचे उपचार करून पुढील उपचारासाठी जळगावला हलविले .