जामनेरच्या पहिल्या विधानसभेला मतदान करणाऱ्या पुखराज मुणोत(89 ) यांनी 13 वेळा मतदान केल्या नंतर 14 व्या विधानसभेसाठी सुध्दा केले मतदान .

0
1026

जामनेर दि .२१ ( मिलींद लोखंडे ): -वयाच शतक गाठायची वाटचाल करणारे मूळचे मालदाभाडी येथील आणि आता जामनेरात स्थायिक झालेले पुखराज शेट मुणोत (भाऊसा) यांनी आज चौदाव्यांदा मतदान केले. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यापासून झालेल्या सर्व चौदा विधानसभा निवडणुकांसाठी त्यांनी मतदान केले आहे. त्यामुळे ते मतदानाला गेल्यावर नव्या पिढीच्या मतदारांसाठी तो कुतुहलाचा विषय ठरला.
देशात महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच १९६० साली विधान सभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या पहिल्या निवडणुकीपासून ते आज (ता. २१) झालेल्या चौदाव्या विधानसभा निवडणुकीत जामनेर विधानसभा मतदारसंघातून जामनेर येथील जळगाव रोड वरील मतदान केंद्रावर कुटुंबातील सर्व सदस्यांना सोबत घेऊन जाऊन मतदानाचा हक्क बजावला.